नेवासा – त्रिभुवनैक पवित्र! अनादि पंचक्रोशक्षेत्र!जेथ जगाचे जीवनसुत्र!श्री महालया असे!!श्री संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी ग्रंथात वर्णन केलेल्या स्थान माहात्म्य असलेल्या नेवासा पंचक्रोशीचे ग्रामदैवत श्री मोहिनीराज भगवंताचा यात्रा उत्सव व त्यानिमित्त श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ व किर्तन बुधवार दि. ५ फेब्रुवारी पासुन सुरुवात होत आहे. मंगळवार दि. ४ फेब्रुवारी रात्री ९ वाजता गोकर्ण आख्यान , दि. ५ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारीपर्यंत नंदादीप ,समई , संहिता !! श्रीमद् भागवत सप्ताह !! ५ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारीपर्यंत कथा निरुपण भागवताचार्य देवी वैभवीश्रीजी (वृंदावन गोकुळ) दुपारी २ ते ६ दि.१२ फेब्रुवारी रोजी श्रीमद भगवद्गीता व विष्णुसहस्त्रनाम सामुहिक पठन सकाळी ८ ते १० व रात्री ९ वाजता भळंद , दि. १३ रोजी पहाटे मा. तहसीलदार यांचे शुभहस्ते विधीवत मानाची पुजा, श्री मोहिनीराज उत्सव मुर्तीचे सवाद्य मंगल कार्यालयाकडे प्रस्थान दुपारी १ वाजता, दि १३ फेब्रुवारी ते दि. १६ फेब्रुवारीपर्यंत दररोज सायंकाळी ६ वाजता महाप्रसाद पंगत.
दि. १३ ते १६ फेब्रुवारीपर्यंत दर रोज रात्री ह.भ.प.सौ. नम्रताई व्यास निमकर यांचे सुश्राव्य किर्तन , दि. १७ फेब्रुवारी पहाटे वडार समाजाच्या वतीने प्रवरासंगम वरुन आणलेल्या कावडीने जलाभिषेक, महाप्रसाद दुपारी १२ ते ३ ,सायंकाळी ६ वाजता श्रीं चे पालखीचे कार्यालयाकडून आगमन व काला , दि. १८ फेब्रुवारी रोजी कुस्त्यांचा हंगामा जि. प .मराठी मुलांची शाळा दुपारी ४ वाजता, दि. १९ मार्च रोजी बैलगाडा शर्यत ,मराठा बोडिंग, श्रीरामपुर रोड, नेवासा येथे सायं. ६ वा. दि. २० फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध जादुगार कुलकर्णी मनोरंजन जादूचे खेळ,दि. २१ समाज प्रबोधनपर कीर्तन छोटे इंदोरीकर माऊली महाराज काकडे,दि. २२ फेब्रुवारी पोवाडा शिवशाहीर श्री. रामानंद उगले असा श्री मोहिनीराज यात्रा उत्सव असुन तरी सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री मोहिनीराज संस्थान अध्यक्ष व विश्वस्त मंडळ व उत्सव समीती ने केले आहे.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.