नेवासा – साईबाबा संस्थानच्या प्रसादालयात देण्यात येणारी मोफत भोजन व्यवस्था यापुढे केवळ भाविक व संस्थानच्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णासाठीच असेल. अन्य नागरिकांना प्रसादालयात भोजन करण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. गुरुवार, ६ फेब्रुवारी पासून या निर्णयाची अमलबजावणी सुरू होईल. भाविकांना प्रसाद भोजन घेणे अधिक – सुलभ आणि सुरक्षित व्हावे यासाठी व निर्णय घेण्यात आल्याचे साईबाबा संस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर न यांनी संगितले.काही लोक भोजनालयात मद्यपान करून येत असल्याचे तसेच भोजनानंतर न परिसरातच धूम्रपान करत असल्यामुळे साईभक्तांना त्रास होतो.
या सारख्या अनेक तक्रारींमुळे प्रशासनाने हा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रसादालयात सध्या जवळपास रोज पंचेचाळीस हजार भाविक मोफत प्रसाद भोजनाचा लाभ घेत आहेत.दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी मंदिराच्या बाहेर उदी-प्रसाद वाटप काउंटरजवळ मोफत भोजनाचे कूपन दिले जाईल, ते दाखवून मुख्य प्रसाद भोजन हॉलमध्ये प्रवेश मिळेल. मुखदर्शन घेणाऱ्या भाविकांसाठी मुखदर्शन हॉलमध्ये ऐच्छिक मोफत प्रसादभोजनाचे तिकीट दिले जाईल. संस्थान निवासस्थानातील भाविकांसाठी निवासस्थानातील स्वयंसेवी भोजन कक्षामध्ये रूमची पावती, चावी दाखवून प्रवेश दिला जाईल. रुग्णालयातील नातेवाईकांसाठी केसपेपर, अॅडमिट कार्ड दाखवून द्वारावती भक्तनिवास येथील प्रसाद भोजन कक्ष, मुख्य प्रसादालयात प्रवेश दिला जाईल. कुणाला दर्शनापूर्वी प्रसाद भोजन घ्यायचे असेल तर त्यांनाही मोफत व्यवस्थेचा लाभ मिळेल. सशुल्क प्रसाद भोजनाची व्यवस्था पूर्वीप्रमाणेच सुरू राहील.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.