गणेशवाडी – माहेराहून चार चाकी वाहन घेण्यासाठी पाच लाख घेऊन ये असू म्हणत विवाहित महिलेचा छळ केल्या प्रकरणी सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत दि. २४ रोजी प्राजक्ता चेतन वाळुंजकर रा. न्यु प्रेमदान चौक अहिल्यानगर (हल्ली रा. कन्हेरवस्ती सोनई), हिचा विवाह काही दिवसांपूर्वी अहिल्यानगर येथील चेतन किशोर वाळुंजकर याच्याशी झाला होता. नव्या नवरीचे नऊ दिवस या प्रमाणे तिस काही दिवस व्यवस्थित नांदवले.काही दिवसांनी फिर्यादी च्या नवऱ्याने मला दुसरे लग्न करायचे आहे मला तच घटस्फोट दे याचा राग सासू, सासरे, नंनद यांना राग आल्याने पुन्हा शिवीगाळ करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

दि. २२ रोजी अहिल्यानगर येथील भरोसा सेल मध्ये तक्रार अर्ज दाखल केला. तरी देखील त्यांच्यात समझोता न झाल्याने त्यांचे वर सोनई पोलीसांना कायदेशीर कारवाई करण्याचे पत्र दिले. म्हणून फिर्यादी यांनी सोनई पोलीस ठाण्यात हजर होऊन चेतन किशोर वाळुंजकर, किशोर किसनराव वाळुंजकर, नंदा किशोर वाळुंजकर, भावना वैभव दांगट सर्व राहणार न्यु प्रेमदान हडको अहिल्यानगर यांनी मानसिक व शारीरिक छळ करून चार चाकी वाहन घेण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याचे दाखल फिर्यादी मध्ये म्हटले आहे. दाखल फिर्यादी वरुन सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा र. नं. ४६/२०२५ भादवि कलम ४९८(अ), ३२३,५०४,५०६,३४प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांचे मार्गदर्शनाखाली स.फौ. रविंद्र लबडे हे करत आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.