ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
उदयनदादा गडाख

राजकीय संघर्षाच्या व अडचणीच्या काळात प्रमुख सत्ताकेंद्र विरोधात असतांना मित्रांसह खेळण्या ,बागडण्याचे दिवस सोडून
माझा गाव,माझा परिसर,माझी माणसे,माझा तालुका याविषयी असलेल्या आपुलकी , जिव्हाळ्यामुळे नाविन्यपूर्ण व दिशादर्शक काम करण्याची खूणगाठ मनाशी बांधून वयाच्या विशीतच महाविद्यालयीन शिक्षण सुरू असतांना नेवासा तालुक्यातील गावा ,गावांतील तरुण बांधव,जेष्ठ वडीलधारी मंडळी,माता भगिनींच्या सुख दुःखात,अडी ,अडचणीत स्वतःहून सहभागी होऊन जनसामान्य जनतेच्या प्रश्नांकडे स्वत:चा प्रश्न म्हणून पाहून प्रामाणिकपणे तो सोडविण्यासाठी त्यांनी सुरवात केली… लहानातील ,लहान प्रश्नां पासून ते अनेक किचकट विषय समजून घेत आत्मसात केले व सहज हातावेगळे करत सर्वसामान्य जनतेच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचे काम त्यांचे नेहमीच सुरू असते… 80 ते 85 वर्षांच्या जेष्ठ आजोबापासून ते 10 वर्षापर्यंतच्या लहानग्या मुलांशी त्यांनी मित्रत्वाचे हळुवार ऋणानुबंध निर्माण केले

उदयनदादा गडाख

अल्पावधीतच सर्वाना मनापासून आपलेसे करण्याची कला आत्मसात असलेले उदयन गडाख हे सर्वांचे लाडके उदयनदादा गडाख बनले. कुणालाही आपली वेदना त्यांच्याशी सांगतांना कधीही अवघडल्यासारखे होत नाही. प्रश्न कोणताही असो ज्यावर त्यांच्याकडे तात्काळ योग्य उत्तर उपलब्ध असते यामुळे त्यांच्याकडे समस्या सोडवण्यासाठी सदैव जनतेचा, सवंगड्याचा राबता असतो. आपला ,विरोधक हा भेद काम करतांना त्यांनी कधीही केला नाही. राजकीय विरोध न पाहता सर्वांशी एकरूप होऊन जे ,जे काम समाजासाठी करता येईल यासाठी ते सदोदित प्रयत्नशील असतात.

तालुक्यातील विवाह समारंभ,कीर्तन, सप्ताह, यात्रा, कुस्त्यांचे आखाडे, बैलगाडा शर्यत,व्हईक ,शिवजयंती उत्सव,डॉ बाबासाहेब आंबडेकर जयंती उत्सव, व रामनवमी उत्सव व इतर सर्वच जयंती उत्सव ,स्नेहसंमेलने,रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे, महिलां भगिनींचे सन्मान सोहळे, क्रिकेट स्पर्धा,व्हॉलीबॉल सामने,कबड्डी स्पर्धा,श्रमसंस्कार शिबिरे यामध्ये सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी व समाजाच्या सर्वागीण प्रगतीसाठी ज्यांची सदैव धडपड असते. तालुक्यातील गरजवंत नागरिकांना ,आजारी पेशंट यांना रात्री ,अपरात्री हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांशी थेट संपर्क करून माझ्या घरातील माणूस ऍडमिट आहे या पद्धतीने उपचार करा ,बिलाचे मी पाहतो असे सांगून प्रसंगी त्या रुग्णाचे बिल स्वतः भरून त्या रुग्णास जीवनदान देत कधीही त्याचा बडेजाव न करणारे खरे आरोग्यदुत…. महाविद्यालयीन शिक्षण घेणारे विद्यार्थी,विद्यार्थीनी यांच्या शिक्षणात व्यत्यय येऊ नये यासाठी प्रशासनाला सांगून विद्यार्थ्यांना फी नसतानाही शिक्षण मिळावे यासाठी कटिबद्धतेने काम करणारे विद्यार्थी मित्र….

उदयनदादा गडाख

लहानातील लहान कार्यकर्त्याचा सन्मान करणारे त्यांच्या सूचनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे कृतिशील व्यवस्थापक… तालुक्यातील संघटनेच्या सर्वच कार्यकर्त्यांचा सन्मान करून त्यांचा मोठेपणा जपणारे
मायाळू नेतृत्व… मनात जे आहे तेच ओठावर असणारे निर्मळ व्यक्तिमत्व… आपल्या अभ्यासपूर्ण मनोगताने सर्वांच्या ह्रदयाचा ठाव घेणारे शब्दाला कृतीची जोड देणारे कृतिशील नेतृत्व… मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष म्हणून काम करतांना आपल्या अभ्यासपूर्ण शैलीने विद्यार्थ्यांच्या प्रगतीला वाव मिळावा यासाठी मान्यवरांचे व्यख्याने,यशोरंग सांस्कृतिक महोत्सव यांचे भव्यदिव्य आयोजन करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणारे खरे मार्गदर्शक… संस्थेतील सेवक हे कर्मचारी नसून ते माझे कुटूंब सदस्यच आहेत या उदात्त हेतूने सेवानिवृत्त सेवकांचा कृतज्ञता सन्मान करून त्यांच्या समर्पणाप्रती कृतज्ञता भाव जपणारे आदर्श कुटूंबप्रमुख…

उदयनदादा गडाख

ज्या खांद्यावर बसून आपण हे जग पाहिले त्या खांद्यांना कधीही विसरायचे नसते या जेष्ठ साहित्यिक मा खा यशवंतरावजी गडाख साहेब यांनी दिलेल्या शिकवणीचा वसा व वारसा जपत विनम्रपणे जेष्ठांचा आदर सन्मान जपणारे… नोकरी, व्यवसायाच्या वाटेवर असलेल्या तरुण मित्रांना योग्य ते मार्गदर्शन घरबसल्या उपलब्ध व्हावे यासाठी हजारो विद्यार्थ्यांचा मेळावा घेऊन त्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शिक पुस्तिका उपलब्ध करून देऊन त्यांच्या यशाची पायाभरणी करणारे दातृत्वशील मित्र… भविष्याचा वेध घेऊन
नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारे दिलदार सोबती… प्रवरासंगम पासून ते वांजोळी पर्यत तालुक्यातील सर्वांना सहज उपलब्ध होणारे… श्री क्षेत्र शनी शिंगणापूर,श्री क्षेत्र ज्ञानेश्वर मंदिर नेवासा, श्री क्षेत्र त्रिवेणीश्वर, श्री क्षेत्र सिद्धेश्वर मंदिर टोका,जगदंबा माता सोनई,रोकडोबा हनुमान बेलपिंपळगाव ,घोडेगावची घोडेश्वरी माता यासह तालुक्यातील सर्वच देवस्थानांवर अपार श्रद्धा ठेवून काम करणारे श्रद्धावान…

उदयनदादा गडाख

मा खा यशवंतरावजी गडाख साहेब,मा आ शंकररावजी गडाख साहेब,मा विश्वासराव मामा गडाख यांच्या सहकार्यांशी कृतज्ञता ठेवून त्यांचा नेहमी आदर करत मार्गदर्शन घेणारे. मा प्रशांतभाऊ ,मा सुनीलभाऊ,मा विजयभाऊ, मा सौ सुनीताताई यांच्याकडून सामाजिक भावना ठेवून काम कसे करावे याची शिकवण घेत अखंड कार्यरत असेलेले… आपल्या विवाहातही डॉ सौ निवेदिताताई गडाख यांच्यासह संकल्प करून गरजवंत विद्यार्थ्यांना सायकल व शालेय साहित्य भेट देऊन विद्यार्थ्यांच्या जीवनात खऱ्या अर्थाने आनंद निर्माण करणारे… धार्मिक ठिकाणांची मित्रांसह स्वच्छता मोहीम राबवत स्वच्छतादूत म्हणून काम करणारे युवकांचे आयडॉल… मा प्रशांतभाऊंच्या मार्गदर्शनाखाली आदर्शगाव मोरयाचिंचोरे येथे सुरू असलेली वृक्षारोपन चळवळ प्रभावीपणे कार्यरत राहण्यासाठी प्रयत्नशील असणारे वृक्षप्रेमी. कोरोना काळात बंद असलेली नेत्रदान चळवळ नव्याने सुरू करत अंधाच्या जीवनात प्रकाशाची वाट फुलवनारे प्रकाशदूत…

उदयनदादा गडाख

विविध कार्यक्रमांचे एकहाती नियोजन करणारे उत्कृष्ट संघटक…. अनेक कार्यक्रमांचे स्वतः अचूक नियोजन करून स्वतः जनतेसोबत बसत कार्यक्रम व सभा ऐकणारे सदैव जनतेशी समरस असलेले तरुण नेते.मोठया राजकीय चिखलफेकीतही
स्थितप्रज्ञाप्रमाणे राहून आपली खेळाडूवृत्तीचे दर्शन आपल्या कृतीतून दाखवणारे तरुण नेतृत्व.. तालुक्यासह, जिल्हाभरात अल्पावधीतच मोठा मित्रपरिवार कमावलेले व सदैव सर्वांशी आपुलकीने वागणारे तरुण नेते…ज्यांच्या नावातच उदय आहे असे
सर्वागीण भविष्याचा वेध घेत अखंड कार्यमग्न राहून काम करणारे कृतीशीलता,गतिशीलता,विनयशीलता याचा त्रिवेणी संगम असलेले युथ आयकॉन उदयन दादा गडाख यांना वाढदिवसानिमित्त लक्ष ,लक्ष शुभेच्छा… आपल्या सर्व इच्छा, आकांक्षा, मनोकामना पूर्ण होवोत हीच सद्गुरु शंकर महाराज चरणी प्रार्थना…
वाढदिवस अभिष्टचिंतन….
शब्दांकन.
राहुल राजळे…
9527110809

उदयनदादा गडाख
उदयनदादा गडाख

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

उदयनदादा गडाख
उदयनदादा गडाख

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

उदयनदादा गडाख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!