भेंडा – महिलांनी कोणतेही हेवेदावे न करता आलेला प्रत्येक दिवस आनंदात जगला पाहिजे. एखादी स्त्री चुकत असेल तर तिला वेळीच सावध केले पाहिजे. महिलांवरील अत्याचार थांबवून समाज पुढे न्यायचा असेल तर स्त्री आणि पुरुष ही दोन्ही चाके समांतर असावी. महिलांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून आपले कर्तव्य केले पाहिजे असे मत ॲड. सौ. स्मिता संजय लवांडे यांनी व्यक्त केले.भेंडा येथील जिजामाता शास्त्र व कला महाविद्यालयात विशाखा समिती अंतर्गत ‘जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले स्मृतिदिन’ निमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. दोनशे वर्षांपूर्वी सावित्रीबाईंनी शिक्षणाचे महत्त्व जाणले म्हणून आज महिला शिक्षण घेऊन प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा प्रत्यय देत आहे.

प्रत्येक महिलेने सर्व क्षेत्रातील महिलांना सोबत घेऊन जाण्याचा संकल्प जागतिक महिला दिनानिमित्त करावा, असेही त्या म्हणाल्या. शिक्षण संस्थेचे विश्वस्त प्रा. डॉ. नारायण म्हस्के अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य डॉ. शिरीष लांडगे, पत्रकार नामदेव शिंदे, माजी सरपंच रोहिणीताई निकम, उपसरपंच संगीता नामदेव शिंदे, वर्षाताई नवले व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी विविध उपक्रमातील विजेत्या विद्यार्थीनी व महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. प्रा. तेजल सोनवणे व विद्यार्थीनी अंजली जाधव यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

याप्रसंगी सर्व महिला प्राध्यापिका व विद्यार्थीनींची संगीत खुर्ची आणि वेगवेगळे फणी गेम्स घेण्यात आले. प्रा. केशव चेके, प्रा. डॉ. काकासाहेब लांडे, प्रा. सरिता नवथर, प्रा. डॉ. मृणाल भोसले, प्रा. मीना पोकळे, प्रा. बोरा ऋतुजा, प्रा. गीता जाधव, श्रीम. मंदा तुपे, सौ. मिराबाई शिरसाठ, सौ. जयश्रीबाई वैरागर, सौ. सुनीता गुंजाळ यांचेसह महिला प्राध्यापिका व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रिया निंबाळकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. मोहिनी साठे यांनी केले. प्रा. देवकी ढोकणे यांनी आभार व्यक्त केले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.