नेवासा – दि. 5 फेब्रुवारी 2025 सलाबतपुर शिवारात कत्तलीसाठी बांधून ठेवलेला 5 गोवंशीय जनावरांची नेवासा पोलिसांनी सुटका केलेली आहे. सविस्तर वृत्त असे की, सोमवार दि. 3 फेब्रुवारी रोजी नेवासा पोलिसांना गोपनीय खबर मिळाली की, सलाबतपुर ता. नेवासा येथील यासीन कुरेशी व निसार कुरेशी यांचे शेतामध्ये 5 गोवंशय जनावरे कत्तलीसाठी बांधून ठेवलेली आहेत. अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक धनंजय अ. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा पोलिस पोलीस ठाण्यातील डी.बी. पथकातील पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील, पोलीस नाईक अरुण गांगुर्डे,
पोलीस कॉन्स्टेबल सुमित करंजकर, अवि वैद्य, नारायण डमाळे, अमोल साळवे भारत बोडके यांनी गोपनीय मिळालेल्या बातमीनुसार सलाबतपुर परिसरामध्ये जाऊन छापा मारला असता त्या ठिकाणी यासीन कुरेशी व निसार कुरेशी याच्या घराच्या पाठीमागे शेतातील पडीक जमिनीतील काटेरी झुडपात 52 हजार रुपये किमतीची 5 गोवंश जनावरे कत्तलीसाठी बांधल्याचे दिसून आले. सदरची जनावरे दोन पंचांसमक्ष ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना खाजगी वाहनाने आनंद गोशाळा खडका फाटा ता. नेवासा येथे दाखल केली आहेत. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल अमोल साळवे पोलीस ठाणे नेवासा यांचे फिर्यादीवरून पोलीस ठाणे नेवासा येथे यासीन कुरैशी व निसार कुरेशी यांच्या विरूद्ध महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियमाच्या विविध कलमाखाली गुन्हा नोंदवण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक फौजदार गणेश नागरगोजे पोलीस ठाणे नेवासा हे करीत आहेत.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.