ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
पंचगंगा

नेवासा : नेवासा, श्रीरामपूर,गंगापूर आणि वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पंचगंगा शुगर साखर कारखाना येत्या १० एप्रिलपर्यंत गाळप प्रक्रिया सुरू ठेवणार आहे. शेतकरी बांधवांनी आपल्या उसाचा योग्यप्रकारे पुरवठा करावा, असे आवाहन कारखाना प्रशासनाने केले आहे. पंचगंगा साखर कारखान्याने ५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत एकूण १,५२,००० टन ऊसाचे यशस्वी गाळप केले आहे. सध्या कारखाना प्रतिदिन ६,५०० टन ऊस गाळप करण्याच्या क्षमतेने कार्यरत आहे. या गाळप प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊस पुरवठा केल्याबद्दल कारखान्याने त्यांचे आभार मानले आहेत.

पंचगंगा

कारखान्यास ऊस पुरवठ्यासाठी प्रतीक्षेत असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या ऊसाचे गाळप वेळेत पूर्ण करण्याची हमी पंचगंगा कारखाना प्रशासनाने दिली आहे. परिसरातील आणि शेजारच्या तालुक्यांतील कोणत्याही शेतकऱ्याचा ऊस गाळपाविना राहणार नाही, याची खात्री कारखाना प्रशासनाने दिली आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित उसाचे अचूक वजन आणि योग्य दर मिळवण्यासाठी पंचगंगा कारखान्यास ऊस पुरवठा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. कारखान्याच्या व्यवस्थापनाने ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना पूर्ण सहकार्याची ग्वाही दिली आहे

पंचगंगा साखर कारखाना येत्या १० एप्रिलपर्यंत ऊस गाळप प्रक्रिया सुरू ठेवणार असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस योग्य वेळी कारखान्याकडे पाठवावा. कारखाना प्रशासन शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असून, सर्व ऊस वेळेत गाळप करण्याची हमी दिली आहे.

पंचगंगा
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पंचगंगा
पंचगंगा
पंचगंगा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पंचगंगा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!