ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
त्रिमूर्ती

नेवासा – भोपाळ मध्यप्रदेश येथे झालेल्या शालेय राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये देशातील विविध राज्य तसेच केंद्रशासित राज्य असे एकूण ३३ राज्यांनी सहभाग नोंदविला. एकूण शालेय रायफल शूटिंग राष्ट्रीय स्पर्धेमध्ये ११८८ खेळाडूंनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेमध्ये श्री. दादासाहेब हरिभाऊ घाडगेपाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची निकिता रोकडे हिने १० मीटर ओपन साईट रायफल खेळ प्रकारात महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत महाराष्ट्र संघाला सुवर्णपदक मिळवून दिले. तसेच त्रिमूर्ती पब्लिक स्कूलचा साहिल सोनुने याने महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत सांघिक रौप्यपदक प्राप्त केले.

त्रिमूर्ती

यशस्वी खेळाडूंना त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचे संस्थापक साहेबराव घाडगेपाटील, अध्यक्षा सुमतीताई घाडगेपाटील, उपाध्यक्षा स्नेहलताई घाडगेपाटील, सचिव मनीष घाडगेपाटील, एनडीए प्रमुख कर्नल के. पी. सिंग, टी. एम. एस. विद्यालयाचे प्राचार्य सोपान काळे, टी. पी. एसचे प्राचार्य सचिन कर्डिले, वांढेकर, त्रिमूर्ती सिनिअर कॉलेजच्या अनुराधा गोरे व प्राचार्य अरसुळे, मुख्य क्रीडा समन्वयक संजयसिंग चव्हाण, विभाग प्रमुख अरविंद देशमुख, अशोक कानवडे, अरुण डोळसे,संतोष राऊत, राजेंद्र कात्रस, झांबाडे, विभाग प्रमुख एकनाथ कापसे, उमाजी जंगले, नामदेव ताके, संतोष निबाळकर, मिलिंद सोनवणे, साबळे नवनाथ बस्मे, मिलेक्ट्री इन्चार्ज परमेश्वर कसाळ, गजानन समिंदर यांच्याकडून शुभेच्छा देण्यात आल्या.

यशस्वी खेळाडूंना प्रशिक्षक छबुराव काळे, सुनीता लिपणे यांचे प्रशिक्षण लाभत आहे. अभिजीत दळवी, संभाजी निकाळजे, महादेव काकडे, अशोक पानकडे, गणेश शिंदे, संदीप वाघमारे, शेळके, दाने, गायके, चिरमाडे, समीर पठाण, अमीर पठाण, गायकवाड, सरोदे, समीर पठाण आदी प्रशिक्षकांचे सहकार्य लाभत आहे.

त्रिमूर्ती
त्रिमूर्ती

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

त्रिमूर्ती
त्रिमूर्ती
त्रिमूर्ती

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

त्रिमूर्ती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!