पाचेगाव – नेवासा तालुक्यात पाचेगाव येथे शिवाजीराव पवार कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयात नव्याने प्रवेश घेतलेल्या डी फार्म ६० बी फार्म १०० आणि एम फॉर्म ७५ विद्यार्थ्यांसाठी स्पंदन २०२५ या स्वागत समारंभ उत्साहात पार पडला.
नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयांमध्ये स्नेहपूर्ण वातावरण तयार करण्यासाठी मुलांची अभ्यासाबद्दल कॉलेज परिसराबद्दल मनातील शंकायुक्त भीती दूर व्हावी व त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने स्पंदन २०२५ या उपक्रमाचे आयोजन शिवा ट्रस्ट पाचेगाव कॅम्पस येथे आयोजन करण्यात आले. एम फार्मसी विभागप्रमुख डॉक्टर अभिजीत शेटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

बी फार्मसी चे विभाग प्रमुख प्रोफेसर बाबासाहेब चोपडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले आणि महाविद्यालयाची माहिती सर्व विद्यार्थ्यांना दिली. या कार्यक्रमासाठी पाचेगाव येथील बचत गट अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सौ सविता श्रीकांत पवार या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या प्राचार्य डॉक्टर मेघा साळवे यांनी फार्मसी क्षेत्रातील करियर आणि उपलब्ध असलेल्या संधी याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्रीकांत पवार आणि प्रवेश समन्वयक बाळासाहेब जाधव हे उपस्थित होते.

शिवा ट्रस्ट अध्यक्ष डॉ बाळासाहेब शिवाजीराव पवार ह्यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिवा ट्रस्ट पाचेगाव कॅम्पस मध्ये प्रशस्थ क्रीडा सामुग्री सह क्रीडा पटांगण आणि भव्य सभागृह भव्य वाचनालय उपलब्ध आहे. ह्या सुविधांचा लाभ घेऊन आपला सर्वांगीण विकास करावा असे संस्थेचे अध्यक्ष डॉ बाळासाहेब पवार ह्यांनी नवीन विद्यार्थ्यांना आव्हान केले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.