नेवासा – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीमहिना तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळण्यासाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री सुर्यघर मोफत वीज योजनेतील ग्राहकांनाही वीज बिल आकारण्यात येणार आहे. यातील ग्राहकांना संध्याकाळी सहा ते सकाळी नऊ या वेळेत वापरलेल्या विजेवर बिल आकारावे, असा प्रस्ताव महावितरणने वीज नियामक आयोगाकडे दिला आहे. वीज बिल आकारणी झाली, तर मोफत वीजेचीही जुमलेबाजी ठरणार आहे. संबंधित ग्राहकांना बिलाचा शॉक बसणार आहे. कर्ज काढून घरावर सौरऊर्जानिर्मिती पॅनेल्स बसवलेल्यांना बँकेचा हप्ता आणि वीजबिल, असा दुहेरी झटका बसणार आहे.

राज्यात प्रधानमंत्री सुर्यघर मोफत वीज योजनेचा महावितरणननेही व्यापक प्रचार, प्रसिद्धी करत आहे. यामुळे राज्यातील एक लाखांवर वीज ग्राहकांनी आपल्या घराच्या छतावर सौर ऊर्जानिर्मिती पॅनेल्स बसवून वीज निर्माण करत आहेत. घरगुती वापरापेक्षा जास्त वीज तयार झाल्यामुळे वीजबिल शून्य येत आहे. अतिरिक्त वीज महावितरणला पाठवून उत्पन्नही मिळत आहे. पॅनेल्स बसवण्यासाठी केंद्र सरकारकडून तीन किलोवॅटला ७८ हजार रुपयांपर्यंत थेट अनुदान मिळत आहे. दरम्यान, वीज बिलातून सुटका करून घेण्यासाठी याकडे ग्राहक मोठ्या प्रमाणात वळत असतानाच महावितरणने या योजनेतील ग्राहकांना केवळ सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंत मोफत वीज द्यावी आणि त्यानंतरच्या विजेवर विल आकरावे, असा प्रस्ताव आयोगाकडे दिला आहे. यावर १७ फेब्रुवारीपर्यंत हरकती मागवण्यात आल्या. पण, यापूर्वीच्या आयोगाचा अनुभवावरून हरकती कितीही आल्या, तरी महावितरणच्या बाजूनेच झुकते माप असल्याने सूर्यघर योजनेतील ग्राहकांनाही वीज बिल भरण्याची शक्यता अधिक आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.