नेवासा – श्रम प्रतिष्ठान योजना आणि अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे माजी सचिव श्री खानदेशे साहेब यांच्या प्रेरणेतून गरजू होतकरू आणि दुरून विद्यालयात येणाऱ्या विद्यार्थिनींसाठी सायकलिंग चे वाटप करण्यात आले. यावेळी एडवोकेट अलका जंगले डॉक्टर विद्याताई शिर्के उपस्थित होत्या. विद्यालयातील एकूण पंधरा विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात आले. ज्या विद्यार्थिनींना सायकलीचे वाटप केले त्यांची आई ही याप्रसंगी उपस्थित होती . जाणीवपूर्वक माता पालकांना या कार्यक्रमासाठी बोलावण्यात आले होते जेणेकरून मुलीची शाळा व्यवस्थित सुरू राहण्याकडे आई म्हणून ती लक्ष देऊ शकेल. याप्रसंगी अनेक विद्यार्थिनींनी आणि पालकांनी श्री खानदेशी साहेबांचे आभार व्यक्त केले.
अनेक विद्यार्थिनींच्या छोट्या अथवा मोठ्या बहिणी ही शाळेत असल्याने एकीला सायकल मिळाली पण त्यामुळे दोघींचे भवितव्य सुधारले अशी प्रतिक्रिया अनेक माता-पालकांनी व्यक्त केली.अनेक विद्यार्थिनींनी आपल्याला येण्या-जाण्याचा आता त्रास वाचेल आणि वाचलेल्या वेळामध्ये अभ्यास करणे ज्यादा तासाला वेळेवर उपस्थित राहणं शक्य होईल अशी प्रतिक्रिया दिली.
गरजू,होतकरी विद्यार्थिनींना सायकल मिळाल्याने त्या शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर न पडता सातत्याने शिक्षण घेण्याची प्रक्रिया त्यांची सुरू राहील अशी प्रतिक्रिया विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती पानसरे मॅडम यांनी व्यक्त केली.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.