नेवासा – आषाढी एकादशीसह इतरही दिवशी पंढरपुरातील विठुरायाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात. या गर्दीमुळे विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांना अनेक तास रांगेत तिष्ठत उभे राहावे लागते. आता मात्र मंदिर समितीने अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. याच निर्णयांनुसार नव्याने लग्न केलेल्या जोडप्यांना विठ्ठलाचे थेट – दर्शन घेता येणार आहे. त्यांना कोणत्याही रांगेत उभे राहण्याची गरज पडणार नाही.
राज्यभराच्या अनेक भागातून नवीन लग्न झाले की नवदाम्पत्य विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असते. मात्र विठुरायाच्या दर्शन रांगेत या नवदाम्पत्याला तासनतास तिष्ठत उभे राहावे लागते. आता या नवीन जोडप्याला विठुरायाच्या दर्शनाला थांबावे लागणार नसून या नवदाम्पत्याला त्याच्यासोबत आलेल्या तीन लोकांसह थेट दर्शन दिले जाणार आहे.आज मंदिर समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.