ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
जनावर

नेवासा – सलाबतपुर शिवारात कत्तलीसाठी बांधून ठेवलेला 15 गोवंशीय जनावरांची नेवासा पोलिसांनी सुटका केलेली आहे. सविस्तर वृत्त असे की, गुरुवार दि. 30 जानेवारी रोजी नेवासा पोलिसांना गोपनीय खबर मिळाली की, सलाबतपुर ता. नेवासा येथील बब्बू कुरेशी व शहानवाज कुरेशी यांचे घराचे पाठीमागे पाण्याच्या टाकीजवळ 15 गोवंशय जनावरे कत्तलीसाठी बांधून ठेवलेली आहेत.

जनावर

अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक धनंजय अ. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा पोलिस पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील, पोलीस नाईक अरुण गांगुर्डे, पोलीस कॉन्स्टेबल सुमित करंजकर, अवि वैद्य, नारायण डमाळे यांनी गोपनीय मिळालेल्या बातमीनुसार सलाबतपुर परिसरामध्ये जाऊन छापा मारला असता त्या ठिकाणी बब्बू कुरेशी व शहानवाज कुरेशी याच्या घराच्या पाठीमागे तुकाराम पिसे यांच्या मालकीच्या पडीक शेतातील पाण्याच्या टाकीजवळ काटेरी झुडपामध्ये 90 हजार रुपये किमतीची 15 गोवंश जनावरे कत्तलीसाठी बांधल्याचे दिसून आले. सदरची जनावरे दोन पंचांसमक्ष ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना खाजगी वाहनाने गोशाळा गोधेगाव तालुका नेवासा येथे दाखल केली आहेत.

जनावर
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

जनावर
जनावर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

जनावर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!