नेवासा – तहसील कार्यालय मध्ये महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या गुरुवारी शेत व शिव( पानंद)रस्त्याच्या प्रश्नासाठी व समस्या सोडवण्यासाठी जनन्याय दिन कार्यक्रम घेतला जात असून गुरुवार दिनांक 6 फेब्रुवारी,जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्र राज्य शेत व शिव पानंद रस्ता चळवळ समितीचे वतीने जनन्याय दिन कार्यक्रमात माननीय तहसीलदार श्री संजय बिरादार हजर नसल्याणे नायब तहसीलदार श्री किशोर सानप व श्री एस डी कुलकर्णी रोहयो अव्वल कारकून व लिपिक श्री श्रीपत उमाप या अधिकाऱ्यांनी शिव – पाणंद शेत रस्ते चळवळीच्या कार्यकर्त्या बरोबर उपस्थित रस्ता ग्रस्त शेतकऱ्याच्या समस्यावर सविस्तर चर्चा करून शेत रस्ता समस्या निवारणासाठी पुढील कार्यवाहीसाठी जलद गतीने कसे निर्णय होतील याबद्दल मार्गदर्शन केले त्यामुळे शेत रस्ता व शिव पानंद रस्ता चळवळीच्या कार्यकर्ते व शेतकऱ्यांमध्ये काहीसे समाधानाचे वातावरण तयार झाले.
![जनन्याय](https://annews.co.in/wp-content/uploads/2025/01/WhatsApp-Image-2025-01-08-at-07.43.18-1024x1024.jpeg)
महाराष्ट्र राज्य शेत व शिवपानंद चळवळीच्या माध्यमातून चळवळीचे प्रणेते श्री शरद पवळे व समन्वयक श्री दादासाहेब जंगले यांचे मार्गदर्शनाने नेवासा तहसील येथे गुरुवार हा जनन्यायदिन पाळण्याचे तहसीलदार श्री संजय बिरादार यांनी 19 सप्टेंबर 2024 रोजी जाहीर केले होते त्यानुसार महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या गुरुवारी जनन्याय दिन घेण्यात येईल असे तहसीलदार यांनी सुचविले होते त्यानुसार शेत रस्ते शेतकऱ्यांच्या मागण्या व समस्या सोडविण्यासाठी तहसील कार्यालयात जानेवारीच्या तिसऱ्या गुरुवारी न्याय दिनाचे आयोजन करण्यात आले .या जन न्याय दिनास 6 फेब्रुवारी,20 25 रोजी तहसिल कार्यालयातील श्री नायब तहसीलदार किशोर सानप व रो. ह. यो.अव्वल कारकून श्री कुलकर्णी व उमाप लिपिक यांनी शेत रस्ता प्रकरणे हाताळली . त्यामुळे तालुक्यातील उपस्थित असणाऱ्या ५० -६० समस्याग्रस्त शेतकऱ्यांसह कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले.
![जनन्याय](https://annews.co.in/wp-content/uploads/2025/01/WhatsApp-Image-2025-01-11-at-10.58.14-1024x1024.jpeg)
जनन्याय दिनाचे वेळी पोलीस ठाणे कार्यालयाचे श्री अ वि वैद्य साहेब. व श्री बोडखे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व श्री संजय लखवाल गटविकास अधिकारी पंचायत समिती नेवासा व श्री कासार साहेब यांना उपस्थित केले होते यावेळी तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी त्यांच्या समस्यां तहसिलदारांचे आदेश होऊनही दोन-तीन वर्षा नंतरही अजून रस्ते बंदच आहेत. रस्ते अडविणारे दाद देत नाहीत. दादागिरी व आडमुठेपणा करुन त्रास देतात. शेती पडीत ठेवावी लागत आहे.आमचे उत्पन्न बंद झाल्याने व मानसिक , शारीरिक , आर्थिक त्रास होत असल्याने आता आम्हाला जलद गतीने न्याय न्याय द्यावा अशी ही मागणी केली यावेळी श्री कुशिनाथ दगडू फुलसौंदर करजगाव, यांच्या प्रकरणावर विशेष भर देऊन प्रश्न निकाली काढण्यात या यावा यासाठी सर्कल श्री कांबळे यांना दूरध्वनी वरून आदेश दिले परंतु नजीक चिंचोली येथील मिनीनाथ घाडगे रस्त्याबद्दल योग्य तो निर्णय झाल्या नसल्याने पुन्हा त्यावर कार्यवाही करणे अपेक्षित आहे असे तहसीलदार किशोर सानप यांनी सांगितले तसेच भूमि अभिलेख उपधीक्षक गोसावी साहेब यांनी त्यांचे कार्यालयातील श्री रगडे यांना जनन्याय दिनाचे वेळी उपस्थित केले.
![जनन्याय](https://annews.co.in/wp-content/uploads/2025/01/WhatsApp-Image-2025-01-23-at-10.05.06-766x1024.jpeg)
तालुक्यातील काही शिवरस्ते मागील दोन महिन्यात शिव रस्ता मोजणी केली परंतु हद्दीच्या खुणा दाखविल्या नाही म्हणून त्याबद्दलची कारवाई त्वरित करावी अशी मागणी करण्यात आली लवकरच हद्दीच्या खुणा दाखवण्यात येतील अशी यावेळी त्यांनी सांगितले त्याबद्दल चळवळीचे वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. भूमि अभिलेखचे कार्यालय अधीक्षक यांना संपर्क करुन श्री संदीप गोसावी उपअधीक्षक भुमिअभिलेख यांना न्याय दिनास कार्यालयातील श्री रगडे यांना उपस्थित केले. त्यांनी३४ शिव रस्त्यांचे मोजणीचे कार्यक्रम तयार केला व तसे आदेशही काढले व त्यातील चार ते पाच शिव रस्त्यांची मोजणी ही केली आता हद्दीच्या खुणा दाखविण्यासाठी तारखा निश्चित करीत आहेत असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य शेत व शिवपानंद रस्ता चळवळीचे उपाध्यक्ष श्री नाथाभाऊ शिंदे यांनी शेत रस्ता व शिव रस्ता समस्या सोडविण्यासाठी चा जनन्याय दिनाचा बोर्ड- फलक तहसील कार्यालयात तहसीलदार साहेबांच्या परवानगीने लावला तहसीलदारने पुन्हा फलक जन न्याय दिनाचे गुरुवारी लावण्याची मान्य केले. पुढील जनन्याय दिनाचे वेळी मागील कामाची प्रकरणाची कार्यवाही केल्याचा आढावा घेण्यात यावा तसेच शेत रस्ता ग्राम समिती प्रत्येक गावामध्ये स्थापन झालेली नाही त्या संदर्भात पुन्हा स्मरणपत्रे देऊन तलाठी व ग्रामसेवक यांनी शेत रस्ता स्थापन लवकर कराव्यात व त्याचा अहवाल घेण्यात यावा असे सुचविले.
![जनन्याय](https://annews.co.in/wp-content/uploads/2025/01/WhatsApp-Image-2025-02-02-at-5.37.27-PM-1024x1020.jpeg)
गट विकास अधिकारी पंचायत समिती नेवासा श्री संजय लखवाल बीडिओ यांनी शेत रस्ता समित्या स्थापनेबाबत जीआरच्या तरतुदीनुसार तहसीलदारांचे आदेश राबविण्यात असमर्थता दाखविली असताना नायब तहसीलदार तहसीलदार यांनीगट विकास अधिकारी यांना समक्ष ग्रामविकास अधिकारी यांच्याकडून गाव रस्ते समिती स्थापन करून घेतो असे आश्वासन दिले व जलद गतीने शेत रस्ता समस्या सोडविण्यात याव्यात असे सुचविले.
महाराष्ट्र राज्य शेतकी आनंद चळवळीचे प्रणेते व अध्यक्ष श्री शरद राव पवळे व राज्य समन्वयक श्री दादासाहेब जंगले यांनी गेल्या महिन्यात मंत्रालयामध्ये माननीय नामदार चंद्रशेखर बावनकुळे साहेब महसूल मंत्री यांची समक्ष भेट घेतली असता शेत शिवपानंद रस्त्यांच्या जीआर मध्ये त्रुटी आहेत त्या त्रुटी दूर करून शासन निर्णयात घेण्यात याव्यात यासाठी पाठपुरावा केला असता श्री बावनकुळे साहेब यांनी काल गुरुवारी मुंबईमध्ये बैठक घेऊन शिव पानंद व शेत रस्त्या समस्यावर मांडलेल्या त्रुटी. शासन निर्णयात घेऊन जीआर काढला आला.
शेत रस्त्याच्या समस्या सोडवण्यासाठी नेवासा जिल्हाधिकारी सालीमठ साहेब यांनी महाराज अभियान दिनांक 13 जानेवारी 2025 ते 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत राबविण्याचे काढलेल्या परिपत्रकाचा आढावा घेण्यात आला परंतु या पत्रकाचे तीन तेरा या नेवासा तहसील प्रशासनाने वाजविले आहेत, कोणतीही कार्यवाही झालेली नाही केली आहे त्यामुळे नेवासा हा झिरो पेंडिंग केसेस झाल्या पाहिजेत असा प्रयत्न करण्यात यावा असे सुचविले.
![जनन्याय](https://annews.co.in/wp-content/uploads/2024/12/WhatsApp-Image-2025-01-03-at-11.49.34-1024x1024.jpeg)
यावेळी तालुक्यातील शिव – पाणंद रस्ता चळवळीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष नाथाभाऊ शिंदे , सागर सोनटक्के , कृष्णा घोडेचोर, पत्रकार कारभारी गरड श्रीपत दारुंटे, ,शिवाजी काळे,राजू गरड, मुरलीधर जरे, रमेश भक्त,, कुशिनाथ फुलसौंदर , अक्षय कल्याण कांगुणे ,बाळू थोरात , सुजित तुवर,विठ्ठल करमड , मिनिनाथ घाडगे , श्री नवनाथ घावटे, संदीप सातदिवे संदीप सातदिवे नितीन सातदिवे अंबादास लासुरे, कचरू वाबळे, अनिल सरोदे, प्रशांत चौधरी जनार्धन जरी आसिफखान पठाण, सगाजी आयनर, बबन शिंदे, संतोष शिंदे,सोमनाथ शिंदे ,संभाजी पवार .गणेश बोचरे सोमाभाऊ माकोणे व सोपान विठ्ठल पवार व त्यांचे गावकरी आदिंसह सुमारे ५० हुन अधिक शेतकरी उपस्थित होते. आता येत्या फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी २० फेब्रुवारी २०२५ रोजी शेत रस्ता समस्याग्रस्त शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.
![newasa news online](https://annews.co.in/wp-content/uploads/2020/07/abhi-1024x512.png)
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
![जनन्याय](https://annews.co.in/wp-content/uploads/2020/09/telegram-invite.png)
![जनन्याय](https://annews.co.in/wp-content/uploads/2025/01/WhatsApp-Image-2025-01-17-at-20.40.55-1024x1024.jpeg)
![जनन्याय](https://annews.co.in/wp-content/uploads/2020/08/photo6147886037003776927.jpg)
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.