ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
स्नेहसंमेलन

सोनई – मुळा पब्लिक स्कुलच्या वतीने आयोजित करण्यात आलेला वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. चिमुकल्यांनी यशोरंग कलाविष्कार मध्ये उत्कृष्ट सादरीकरण करुन उपस्थितांची वाहवा मिळविली.

विद्यालयाचे माजी विद्यार्थी व सध्या विविध पदांवर कार्यरत असलेले संशोधक बाबासाहेब तांदळे, वरिष्ठ पोलीस अधिकारी
अतुल भोस, मालेगावचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे यांच्या प्रमुख उपस्थितीत उदघाटन व बक्षीस वितरण करण्यात आले.मुळा एज्युकेशनचे उपाध्यक्ष उदयन गडाख अध्यक्षस्थानी होते. विश्वस्त डाॅ.भाऊसाहेब गवळी, उदय पालवे,पसायदान-आनंदवन सेवाभावी संस्थेचे उपाध्यक्ष विनायक दरंदले, डाॅ. बाबासाहेब शिरसाठ,यश अकॅडेमीचे प्राचार्य अझर गोलंदाज, वैभव आढाव उपस्थित होते.

स्नेहसंमेलन

प्राचार्य बाबासाहेब मुसमाडे यांनी अहवाल वाचन मध्ये विद्यालयाची यशस्वी वाटचाल सांगून शैक्षणिक प्रगतीची माहिती दिली. संजय जाधव यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. उदघाटक बाबासाहेब तांदळे यांनी जीवनातील आजची उंच भरारी येथील शिक्षकांच्या परिश्रमातून मिळाल्याचे सांगून संस्थापक व जेष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या दूरदृष्टीतून शैक्षणिक प्रगती होत असल्याचे सांगितले.अतुल भोस यांनी आपल्या भाषणात शाळेची शिस्त व अनुभवी शिक्षकांमुळे
सकारात्मक परिणाम झाल्याचे भाषणात सांगितले. अध्यक्षीय भाषणात उदयन गडाख यांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी याकरीता संस्था नेहमी प्रयत्नशील राहील असे सांगून शालेय जीवनातील मुसमाडे व जाधव सरांच्या आठवणी सांगितल्या. नृत्य शिक्षक सोमेश चव्हाण व भारत शिंदे व सर्व शिक्षकवृंदानी यशोरंग कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. श्रीनिका बानकर,प्रांजल कुरकुटे,समृध्दी दातीर व नबिला मणियार यांनी उत्कृष्ट सुत्रसंचालन केले.

स्नेहसंमेलन
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

स्नेहसंमेलन
स्नेहसंमेलन
स्नेहसंमेलन

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

स्नेहसंमेलन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!