नेवासा – जागतिक कॅन्सर दिनाचे औचित्य साधून नगर येथे आयोजित केलेल्या मॅक्सिमस नगर रायझिंग हाफ मॅरेथॉन स्पर्धेत भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. नरेंद्र घुले पाटील यांनी अवघ्या ७० मिनिटांत १० किलोमिटरचे अंतर पार केले.
नगर येथील नगर रायझिंग फाउंडेशन, मॅक्सिमस स्पोर्ट्स अकॅडमी व शांतिकुमार फिरोदीया मेमोरियल फाउंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने रविवार दि.९ फेब्रुवारी रोजी सकाळी अहमदनगर क्लब येथे जागतिक कॅन्सर दिनानिमित्त आयोजित केलेल्या ‘हम फिट तो नगर फिट’ स्पर्धा पार पडली.

या स्पर्धेत डॉ. नरेंद्र फिरोदिया, माजी आ. नरेंद्र घुले पाटील, डॉ. शाम तारडे, डॉ. सतीश सोनवणे, डॉ. क्षितिज घुले पाटील आदींसह विविध वयोगटातील तरुण, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.या मॅरेथॉनमध्ये माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांनी सलग ६ व्या वर्षी १० किलोमीटरचे अंतर अवघ्या ७० मिनिटांत पार करून युवा पिढीसमोर व्यायामाबद्दलचा एक आदर्श ठेवला आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.