सोनई – संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन शाखा सोनई यांच्या वतीने सदगुरू माता सुदीक्षा महाराज व बाबा हरदेव सिंह यांच्या प्रेरणेने भारत भर सुरू असलेल्या प्रोजेक्ट अमृत या उपक्रमाअंतर्गत स्वच्छ जल मन ब्रीद घेऊन रवी दि 23 फेब्रु 2025 रोजी सोनई ता नेवासा येथील ऐतिहासिक महत्व लाभलेली राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या काळात बांधकाम करण्यात आलेली व सोनईसह परिसराची तहान भागवणाऱ्या बारवेची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमात 70 महिला व पुरुष सेवेकरी सहभागी झाले होते सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत 4 तास ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

चार ट्रॉली भरून कचरा या बारवेतुन काढण्यात आला यामुळे या बारवेचा अनेक वर्षांपासून कोंडेलेला श्वास यामुळे मोकळा झाला याप्रसंगी शिवाजी बाफना, सोनईचे मा उपसरपंच अंबादास राऊत ,विठ्ठल महाराज खाडे ,डॉ रामनाथ बडे ,आनंदवनचे विनायक दरंदले संजय गर्जे , किशोर घावटे, राजेंद्र घाटोळे, विशाल भळगट व निरंकारी मंडळाचे सर्व महिला व पुरुष सदस्य आदी याप्रसंगी उपस्थित होते.
4 तासात 70 सदस्यांनी बारवेतून 4 ट्रेलर कचरा काढून बारवेची स्वच्छता केली.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.