सोनई –मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री व देशाचे विद्यमान केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे शनिशिंगणापूर येथील शनीदेवावर नितांत श्रध्दा आहे दरवर्षी ते नवीन वर्षाच्या स्वागताला शनिशिंगणापूर येथे येतात व त्यावेळेसच वंजारवाडी येथे कैलास आव्हाड व कुटुंबीय यांच्या ‘मामा रसवंती ‘या शिवराजसिंह चौहान यांच्या नावाने सुरू केलेल्या रसवंतीगृहास भेट देऊन लाकडी चरखावर स्वतः रस काढून इतरांना आग्रहाने पाजतात व रसवंतीगृहचालक व ग्रामस्थ यांच्याशी मनमोकळा संवाद करतात. यातून चौहान यांचे या परिसराशी कौटुंबिक नाते निर्माण झाले आहे. यावर्षी जानेवरी महिन्यात रसवंतीगृहास
भेट देतांना 14 फेब्रु रोजी मुलगा कुणाल याचे भोपाळ येथे लग्न असुन तुम्हाला आवर्जून यायचे असे निमंत्रण शिवराज सिंह चौहान यांनी आव्हाड यांना दिले होते व पत्रिकाही पाठवणार आहे तुम्ही नक्की या असे म्हणाले होते.

परंतु एवढा मोठा व्याप असतांना खरच पत्रिका आपल्याला येईल का असे आव्हाड यांना वाटत होते. परंतु जनतेशी नाळ असणारे नेतृत्व म्हणून प्रसिध्द असलेले शिवराजसिंह(मामा) चौहान यांनी स्वतः आव्हाड यांना पत्रिका पाठवली व लग्नासाठी 4 दिवस तुम्ही आवर्जून व्हीयआयपी वऱ्हाडी म्हणून या असे आग्रहाने सांगितले व उज्जैन येथे 10 फेब्रुवारीला महाकाल मंदिरात भस्म आरतीची व्यवस्था केली व नंतर चार दिवस कैलास आव्हाड व त्यांचा मुलगा यांची भोपाळ येथील निवासस्थानी राहण्यासाठीची व अल्पोपहार, जेवण ,व्यवस्था केली . शुक्र दि 14 फेब्रु 2025 रोजी द वन ग्रीन लॉन्स येथे सायंकाळी विवाह प्रसंगी आव्हाड यांचा आवर्जून फेटा बांधून सन्मान केला.

या विवाहात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ,उपराष्ट्रपती जगदीप धनकड,बागेश्वर धाम सरकार,मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव,माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यासह अनेक मान्यवरांची आवर्जून भेट घालून दिली व अहिल्यानगर मधील वंजारवाडी येथील रसवंतीवाले हे माझे खास मित्र आहेत या सोहळ्यासाठी खास निमंत्रित पाहुणे आहेत अशी आवर्जून
ओळख करून दिली. देशाभरातील अनेक नामवंत या विवाह सोहळ्यात असतांना देखील केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आवर्जून केलेल्या पाहुणचाराने वंजारवाडी येथील रसवंतीगृह चालक कैलास आव्हाड व त्यांचा मुलगा संकेत आव्हाड हे गहिवरले. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या सर्वसामान्य जनतेशी बांधिलकी जपणाऱ्या या कृतीचे
वंजारवाडी व परिसरातुन कौतुक होत आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.