नेवासा – सौंदाळा ता नेवासा जि अहिल्यानगर येथे श्री क्षेत्र महादेव देवस्थान आहे सदर मंदिर १६५६ या सालातील पुरातन आहे व त्याचा जीर्णोद्धार २०१७ ला ग्रामस्थांनी लोकवर्गणीतुन केला अशी माहिती लोकनियुक्त सरपंच शरदराव आरगडे यांनी दिली
सौंदाळा महादेव देवस्थानची पूर्वी पासुन श्रावण महिन्यात यात्रा भरायची मध्यंतरी ही यात्रा बंद झाली होती परंतु ग्रामस्थांनी पुन्हा शिवरात्री निमित्त अखंड हरीनाम सप्ताहाने सुरवात करून शिवरात्रीच्या दिवशी गंगेच्या पाण्याने महादेवास अभिषेक घालुन यात्रा सुरु केली आहे.

अखंड हरीनाम सप्ताह निमित्त नामांकित महाराजांचे कीर्तन आयोजित केले जाते संपुर्ण गावातील ग्रामस्थ मनोभावे या साप्ताहात सहभागी होतात
शिवरात्रीला सकाळी प्रवरासंगम येथुन पहाटे जाऊन तरुण मंडळ गंगेच पवित्र जल आणून मिरवणूकीने महादेवास अभिषेक घातला जातो
दुसऱ्या दिवशी नामांकित मल्लांच्या उपस्थितीत कुस्त्याचा हंगामा भरवला जातो.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.