गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील सोनई येथे अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांवर पोलीसांनी कारवाई केली.
पोलीस सुत्रांकडून समजलेल्या माहिती नुसार दि. २६ रोजी दिपक कैलास अनारसे( वय.२६) रा. घोडेगाव रोड सोनई तसेच संतोष मनोहर शर्मा (वय.२५) रा. सोनई हे दोघे जण कौतुकी नदी पात्रात दहाव्याच्या ओट्याजवळ गाजा या अंमली पदार्थांचे सेवन करताना मिळुन आले. पोलीस काॅस्टेबल निखिल तमनर यांचे फिर्यादी वरुन गुन्हा र नं ४७/२०२५, ४८/२०२५ , एन डी पि. एस कायदा १९८५ चे कलम ८(क), २७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास पोलीस नाईक बाळासाहेब बाचकर हे करत आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.