पाचेगाव – नेवासा तालुक्यातील गोणेगाव, इमामपूर भागातील शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाची केबल चोरीचे सत्र सुरूच आहे. एकाच महिन्यात दुसऱ्यांदा केबल चोरीचा प्रकार घडल्याने परिसरातील शेतकरी हतबल झाले आहेत. पहिल्याच चोरीचा तपास अद्याप लागला नाही, तोच पुन्हा केबल चोरीची घटना घडली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाऊसाहेब पंढरीनाथ रोडे (वय-६५, रा. गोणेगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, काल दि. २४ फेब्रुवारी रोजी रात्री गोणेगाव शिवारातून १६ शेतकऱ्यांची ७६ हजार किंमतीची केबलची चोरी झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये भाऊसाहेब पंढरीनाथ रोडे व ज्ञानदेव पंढरीनाथ रोड यांची प्रत्येकी ६ हजार रुपये किंमतीची २०० फूट केबल, अण्णा रोडे यांची ४ हजारांची १०० फूट, वसंत रोडे यांची ५ हजारांची १५० फूट, हौशिराम खर्डे यांची ५ हजारांची १५० फूट केबल,

रमेश रोडे यांची ६ हजारांची २०० फूट केबल, रणजित रोडे यांची ५ हजारांची १५० फूट, कडूभाऊ रोडे यांची ५ हजार रुपयांची केबल, रावसाहेब दिघे ४ हजारांची केबल, भगिरथ शेटे यांची ५ हजारांची केबल, अशोक रोडे यांची ४ हजारांची केबल, राहुल गोसावी यांची ५ हजार रुपयांची केबल, वसंत रोडे यांची ४ हजारांची, भास्कर यादव यांची ६ हजार रुपयांची केबल, हबीब शेख यांची दोन हजारांची केबल, बाबासाहेब रोडे यांची चार हजारांची केबल चोरीस गेली आहे. अशा एकूण १६ शेतकऱ्यांची ७६ हजार रुपये किंमतीची २०८० फूट केबल चोरीला गेली आहे.

याकरणी अज्ञात चोरट्यांवर भारतीय न्याय संहिता २०२३, ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी नदी परीसर पिंजून काढला असून परीसरातील सर्व सीसीटीव्ही चेक करत आहेत.दि. ११ फेब्रुवारी रोजी याच परिसरातून १० शेतकऱ्यांची १७५० फूट केबल चोरट्यांनी चोरून नेली. त्याचाच तपास अद्याप लागला नाही, तोच परत १६ शेतकऱ्यांची २३०० फूट केबल चोरीस गेल्यामुळे थोडेफार पाणी उपलब्ध असतानाही पाणी देणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे या केबल चोरांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

मागील ११ फेब्रुवारी दरम्यान इमामपूर येथून १० शेतकऱ्यांची प्रवरा नदीपात्रातुन १७५० फूट लांबीची विधुत मोटारीच्या केबलचोरट्यांनी चोरून नेली.त्यात जवळपास या सर्व ११ शेतकऱ्यांच्या एन उन्हाळ्यात पिके पाण्यावर असताना १०हजार ७५० रुपयांचे आर्थिक नुकसान झाले.त्याचाच तपास आजून लागला नाही तोच परत येथील १६ शेतकऱ्यांची विद्युत केबल २३०० फूट लांबीची चोरी.या केबल चोरी मुळे या भागात थोडेफार पाणी उपलब्ध असताना या घटनेमुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात,त्यामुळे या केबल चोरांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी या भागातील शेतकरी करीत आहे.त्यात शेतकऱ्यांच्या ७६ हजारांचे आर्थिक नुकसान झाले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.