सोनई –सोनई येथील स्मार्ट किड्स अकॅडमीत ,ह भ प प्रा. गोविंद महाराज निमसे यांच्या उपस्थितीत माराठी भाषा गौरव दिन संपन्न झाला याप्रसंगी संस्थेच्या संस्थापक सोनल लोढा उपस्थित होत्या. निमसे महाराज यांनी मराठी भाषेविषयी बोलताना म्हटले की, थोर साहित्यीक, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त वि. वा शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त २७फेब्रुवारी ला मराठी भाषा गौरवदिन साजरा केला जातो. खरे तर मराठी सारस्वताचा पाया १२व्या शतकात श्री संत ज्ञानेश्र्वर महाराजांनी ज्ञानेश्र्वरीची रचना करून घातला, व संस्कृत श्रीमद्भगवद्गीतेवर गीतेवर प्राकृत मराठी भाषेत टीका करुन गुणगौरव केला . संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की, “माझिया मऱ्हाटाची बोल कौतुके l परी अमृतातेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविन l l “
संत ज्ञानेश्र्वर महाराज मराठी भाषेचे गोडवा सांगताना म्हणतात की, “मितीले आणि रसाळ l साच आणि मवाळ l शब्द जैसे कल्लोळ अमृताचे l l”
तसेच श्री संत एकनाथ महाराज मराठी वांगमयाची रचना करताना म्हणतात की,

“संस्कृत वाणी देवे केली l आणि प्राकृत काय चोरापासून झाली ll”
मराठी भाषेच्या बाराखडीची सुरुवात अ आई पासून होते व शेवट ज्ञ म्हणजे ज्ञानाने होतो. महाराष्ट्रात संतांनी मराठी भाषेचा गुणगौरव केलाच पण आधुनिक काळात आचार्य प्र के अत्रे, पू.ल.देशपांडे या नामवंत साहित्यिक व लेखक कवींनी देखील मराठी सारस्वताला ज्वलंत ठेवलं. आजच्या तरुण पिढीला मराठी भाषेचा, मातीचा , मराठी बाण्याचा वारसा जपण्याकरिता “मराठी भाषा दिन”नेहमी प्रेरणा देत राहील. संविधानाने मराठी भाषा दिनाची निर्मिती करुन मराठी भाषेला न्यायच दिला आहे असे म्हणाले, याप्रसंगी स्मार्ट किड्स अकॅडमीचे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.