गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील वांजोळी येथे दि. १६ रोजी दानी वस्ती वर हातात तलवारी व चालु घेऊन सशस्त्र दरोडा घालणारी टोळी अहिल्या येथील स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आली. मा. पोलीस अधीक्षक यांना दरोड्यांच्या गुन्ह्याची प्राथमिक माहिती मिळताच त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना सदरच्या गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पोसई तुषार धाकराव, अनंत सालगुडे , राजेंद्र वाघ , पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, विश्वास बेरड, बापुसाहेब फोलाणे, ह्रदय घोडके, गणेश भिंगारदे,,संतोष लोंढे, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप दरंदले, राहुल सोळंके, यांसह गुन्हे शाखेच्या पोलीस अंमलादाराचे एक पथक तयार करून त्यांना तपासाच्या द्रुष्टीने योग्य त्या सुचना देत पथकाला रवाना करण्यात आले.

सदरच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना गुप्त माहिती द्वारे खबर मिळताच सदरचा गुन्हा हा तुषार सावंत उर्फ सावत्या भोसले व त्याचे साथीदार विकी संजय काळे भोरवाडी, सुशांत सुरेश भोसले रा. पिंपळगाव कौडा, अविनाश फरक खुड्या सावत्या भोसले, रमेश ऊर्फ रम्या सावत्या भोसले, रा. पिंपळगाव कौडा, अभिजीत किरण भोसले , तपेश किरण भोसले, वैभव किरण भोसले, रा. धानोरा ता. आष्टी यांनी मिळून केल्याचे उघड झाले. आरोपींकडून एकुण २,५८,००० रुपये किंमतीचे तिस ग्रॅम वजनाचे सोने जात करण्यात आले. सदरील कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उप विभागीय पोलीस अधिकारी संपत भोसले, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानी गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.