सोनई | संदीप दरंदले – आदर्श विद्या मंदिर सोनंई माध्यमिक विभागाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन२७ फेब्रु २०२५ रोजी साजरा करण्यात आल. कवी कुसुमाग्रज ( वि.वा.शिरवाडकर) यांचा जन्म दिवस मराठी भाषा दिन मानला जातो.त्या निमित्ताने निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.तसेच ” पसायदान”मध्ये २५ मुलींनी सहभाग घेतला होता.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक भाऊसाहेब खेसमाळसकर सर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीम.घुगे मॅडम यांनी केले. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी भाषणे व मराठी भाषेचे मायबोली गीत सादर केले.

तसेच विद्यालयातील ज्येष्ठ अध्यापकदराडे सर यांनी मराठी भाषेचा महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले.मराठी विषयाचे ज्येष्ठ अध्यापक खेसमाळसकर सर यांनी मराठी भाषेचे विविध दाखले देऊन मराठी भाषेचे जतन व संवर्धन कसे केले पाहिजे याचे महत्व सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष भाषणात मराठी भाषेची माहिती सांगून मार्गदर्शन केले. यावेळी श्रीमती निसर्गध मॅडम, फोपसे सर, पवार सर, श्रीम आवटे मॅडम, श्रीम.रासणे मॅडम उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साळवे मॅडम यांनी केले.आभार व समारोप पवार सर यांनी केले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.