सोनई | संदिप दरंदले – नेवासा तालुक्यातील तेलकुडगांव येथे महाशिवरात्रीला ग्रामदैवत श्री क्षेत्र चैतन्य नागनाथ महाराज देवस्थान भव्य यात्रोत्सव निमित्त दर्शन घेतले.तेलकुडगाव येथील नागनाथ देवस्थान हे अतिशय प्राचीन आणि जागृत देवस्थान म्हूणन प्रसिद्ध आहे. यावेळी महाशिवरात्रीला तेलकुडगाव येथे नागनाथ यात्रा भरते. या यात्रेला भाविक भक्तांची मोठी गर्दी असते. यावेळी सप्ताहच्या काल्याच्या कीर्तनाच्या निमित्ताने नेवासाचे आ. विठ्ठलराव लंघे पाटील यांनी आवर्जून हजेरी लावूली. यावेळी आ. विठ्ठलराव लंघे पाटील म्हणाले नेवासा तालुका हे साधू संतांची भूमी आहे.

खुप मोठी अध्यात्मिक परंपरा नेवासाला असून आपण तालुक्यातील धार्मिक तीर्थक्षेत्र विकासासाठी मोठा निधी देणार असल्याचे ते म्हणाले.यावेळी आमदार लंघे यांचे तेलकुडगाव ग्रामस्थानी मोठे जंगी स्वागत केले. यावेळी किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष अंकुश काळे पाटील, सरपंच सतीश काळे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी,भाविक भक्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.