सोनई – मुळा सहकारी साखर कारखान्याच्या ४७ व्या गळीत हंगामाचा सांगता कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. कारखान्याचे संचालक बाळासाहेब गोरे, विश्वास डेरे तसेच ऊस तोडणी मुकादम रतन मानसिंग चव्हाण यांनी सपत्नीक गव्हाण व ऊसाच्या मोळीची विधीवत पुजा केली. माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या शुभहस्ते गव्हाणीत ऊसाची शेवटची मोळी टाकून गळीत हंगामाची सांगता करण्यात आली. याप्रसंगी कारखान्याचे संचालक बाबुराव चौधरी, लक्ष्मण पांढरे, बापुसाहेब शेटे, बाबासाहेब भणगे, बबनराव दरंदले, सोपानराव पंडीत तसेच माजी सभापती रावसाहेब कांगुणे, ह.भ.प.बाळकृष्ण महाराज सुडके , बाळासाहेब सोनवणे, तुकाराम भणगे, तुकाराम बानकर, दत्तात्रय बेल्हेकर, ॲड.गोकुळ भताने, परमानंद जाधव, आदिनाथ रौंदळ, तुकाराम गुंजाळ, दिलीपराव पोटे, कारखान्याचे कार्यकारी संचालक शरद बेल्हेकर, जनरल मॅनेजर शंकरराव दरंदले आदीसह कारखान्याचे कर्मचारी व ऊस तोडणी यंत्र मालक, ऊस तोडणी व वहातुक मुकादम व मजुर, ट्रक, ट्रॅक्टर मालक उपस्थित होते.

याप्रसंगी कार्यक्षेत्रातील सर्व उपलब्ध ऊसाचे गाळप पुर्ण करुन हंगाम यशस्वीपणे चालवल्याबद्दल कारखान्याचे कार्यकारी संचालक शरद बेल्हेकर, वर्क्स मॅनेजर एस.डी.पवार, शेतकी अधिकारी विजय फाटके, चिफ इंजीनिअर डी.बी.नवले, चिफ केमिस्ट एस.डी.देशमुख, डिस्टीलरी मॅनेजर बाळासाहेब दरंदले, को.जन इनचार्ज ए.डी.वाबळे, प्रोडक्शन मॅनेजर एस.डी.गाडे यांचा सन्मान करण्यात आला. कारखान्याने या गळीत हंगामात ६ लाख ३१ हजार मे.टन ऊसाचे गाळप केले. ५ लाख ४८ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले, ४ कोटी ५५ लाख युनिटच्या विज निर्मिती बरोबरच ६१ लाख ९० हजार लिटर इथेनॉल व ८२ लाख लिटर आर.एस. तयार केले. एकुण ८८ दिवस गळीत हंगाम सुरु होता.

सांगता प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबुराव पाटील चौधरी यांनी हंगाम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी मदत केल्याबद्दल सर्व सभासद, ऊस उत्पादक व ऊस तोडणी वहातुक यंत्रणेतील सर्व वाहन मालक व चालक तसेच कारखान्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानून पुढील हंगामासाठी सर्वांना सुभेच्छा दिल्या. पुढील गळीत हंगामासाठी कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांनी त्यांचा सर्व ऊस मुळा कारखान्यालाच गळीतासाठी द्यावा असे अवाहन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कारखान्याचे सचिव रितेश टेमक यांनी केले. मॅनेजर व्ही.के.भोर यांनी उपस्थितांचे आभार मानले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.