भालगाव – हिंदुस्तान कॅटल फीड्स श्रीरामपूर युनिटच्या वतीने जिल्हा परिषद अहिल्यानगर चा मिशन आपुलकी उपक्रमांतर्गत कंपनीच्या सीएसआर फंडातून नेवासे तालुक्यातील जिल्हा परिषद भालगाव शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीच्या १६९ विद्यार्थ्यांना ५७६ वह्यांचे वाटप मान्यवर व ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड,त्रिमूर्ती संकुलाचे दत्तात्रय वांढेकर,शिक्षक नेते सलीम शेख,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश तनपुरे,हिंदुस्तान कॅटल फीड्स चे नरसिंह कुलाडे,महेश जोशी,उद्योजक महेश तनपुरे,देवराव राशीनकर आदि उपस्थित होते.

शैक्षणिक साहित्याच्या केलेल्या गरजू मुलांच्या शिक्षणासाठी मदतीबद्दल शाळेतर्फे हिंदुस्तान फीड्स कॅटल कंपनीच्या अधिकाऱ्यांचा सत्कार शाळेच्या मुख्याध्यापिका सरिता सावंत,पदवीधर शिक्षिका सरस्वती लोंढे यांच्या हस्ते केला.यावेळी गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड म्हणाले की, मिशन आपुलकी उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील शाळेसाठी केलेल्या शैक्षणिक मदत गरजू विद्यार्थ्यांच्या शिकण्यासाठी उपयुक्त आहे.शाळेच्या भौतिक विकासासाठी ग्रामस्थ,शाळा व्यवस्थापन समितीची भूमिका महत्त्वाची असून यापुढे ही पुढाकार घेण्याचे आवाहन केले.यावेळी वह्याचे वाटप केल्यानंतर कंपनी चे अधिकारी नरसिंह कुलाडे,विद्यार्थीनी कोमल रोठे,आलिशा पवार,श्रुती शिरकुले,सत्यम धोत्रे आदीनी मनोगत व्यक्त केली.

शालेय साहित्य वाटप करण्यासाठी पुढाकार घेणारे पदवीधर शिक्षक राहुल आठरे यांनी हिंदुस्थानी कंपनीच्या सामाजिक कार्याबद्दल माहिती दिली तसेच यापुढेही काळात कंपनीच्या फंडातून शाळेच्या भौतिक सुविधा व मुलींच्या सॅनिटरी नॅपकिन साठी पुढील काळात मदत करण्याचे आवाहन यावेळी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षिका मनीषा साळवे,जनाबाई जाधव,शितल झरेकर आदींनी प्रयत्न केले.यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य पोपट खरात,संभाजी धोत्रे,सचिन तनपुरे,अरुण खरात,ज्ञानेश्वर गव्हाणे,कैलास तनपुरे,भारत पवार,बंडू तनपुरे,पोपट नळघे,विजय खरात आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक राहुल आठरे तर आभार अमोल तुपे यांनी मानले. यावेळी गावातील ग्रामस्थ,पालक,महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.