नेवासा – भानसहिवरा येथील सुलोचना बेल्हेकर शिक्षण संस्था संचालित ज्ञानेश्वर पॉलिटेक्निक, ज्ञानेश्वर खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था व बी.सी.ए.कॉलेज विद्यार्थ्यांची परिसर मुलाखतीमधून संभाजीनगर येथील बजाज ऑटो लिमिटेड व एनआरबी बेअरींग लिमिटेड व वेबसम सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड आणि अहमदनगर येथील ए टू झेड लिमिटेड या कंपनीत निवड करण्यात आली अशी माहिती प्राचार्य एच.जे.अहिरे यांनी दिली.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगचे शिक्षण घेता यावे व विद्यार्थ्यांना शंभर टक्के नोकरीची हमी मिळावी
या उदात्त हेतूने संस्थेचे संस्थापक डॉ. सुरेश बेल्हेकर यांनी ज्ञानेश्वर पॉलिटेक्निक, ज्ञानेश्वर खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था व बी.सी.ए. कॉलेजमध्ये कॅम्पस मुलाखती घेतल्या. यामध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन व इलेक्ट्रिशियन या शाखेतील १२४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या वेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश बेल्हेकर, संचालिका डॉ. रंजना बेल्हेकर, संचालक अभिषेक बेल्हेकर आणि प्राचार्य एच.जे. आहिरे व प्राचार्य आर. आर. कांडेकर उपस्थित होते. प्रा. सुदर्शन शिंदे, प्रा. राजेंद्र घुले, प्रा. विनोद भालेकर, प्रा. योगेश मानळ, प्रा. शारुख पठाण, प्रा. अजय बाविस्कर उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.