गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील शनि शिंगणापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत इलेक्ट्रिक मोटारी चोरणारा मुद्देमालासह जेरबंद करण्यात आला आहे.
दि. १ रोजी सहाय्यक फौजदार नितीन सप्तर्षी व चालक पो. हे. काॅ, तेलोरे हे रात्री गस्तीवर असताना रात्री १ वाजेच्या सुमारास कांगोणी गावच्या शिवरात असणाऱ्या एका हाॅटेलच्या मागे अरुण कारभारी शिंदे यांचे शेती गट क्रमांक २६ मध्ये असलेल्या शेततळ्यात असलेली दहा हजार रुपये किंमत असलेली इलेक्ट्रिक मोटार चोरी करण्याचे उद्देशाने चोर आले असल्याचे माहिती मिळाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके, पो.स.ई. कारखेले, स.फौ.माळवे,स.फौ.नितीन सप्तर्षी, चालक पो. हे. काॅ. तेलोरे, पो. हे. काॅ. मोकाटे, पो. हे. काॅ. मुसळे, पो. हे. काॅ. लबडे, पो. काॅ. अजय ठुबे, पो. काॅ. पोंधे,यांनी त्या ठिकाणी तात्काळ जाऊन सापळा रचुन मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.

त्यांचे कडे अधिक चौकशी केली असता आरोपी सुनील दत्तात्रय चाफे व त्याचा साथीदार विशाल मुळे,दोघे रा.जळके (खुर्द) येथील असल्याचे समजले. तसेच त्यांचे कडून दहा हजार रुपये किंमतीची इलेक्ट्रिक मोटार व एम एच २० ए. डब्ल्यू ३१६० क्रमांक असलेली तिस हजार रुपये किंमतीची दुचाकी असा एकुण चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.आरोपींकडून अधिक चौकशी करून परिसरातील इतरही काही चोऱ्यांचा काही तपास लागतो ते पहाण्यासाठी त्यांना पोलीस कस्टडी ची मागणी करणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके यांनी सांगितले.त्यांचे विरुद्ध शिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा. र. नं. ३२/२०२५ भा. न्या. सं. कलम ३०३(२), ६२,३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार ज्ञानेश्वर माळवे हे करत आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.