सोनई – नेवासा तालुक्यातील शिंगवेतुकाई हे गाव अवर्षग्रस्त गाव असून पावसाळासंपताच या गावात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होतेत्यामुळे जवळून जाणाऱ्या वांबोरी चारीमधून काही प्रमाणात या गावाला पाणी दिले जाते त्यामुळे जनावरास पिण्यासाठी तसेच चारा पिके व इतर काही पिकांना पाणी उपलब्ध होतेमार्च महिना लागल्याने उन्हाची तीव्रता वाढली असून पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.

राहुरी, पाथर्डी, अहिल्यानगर तालुक्यातील अनेक गावांना वांबोरीचारीचे पाणी सुरू असुन शिंगवेतुकाई गावाला पाण्याची तीव्र टंचाई असूनहीजाणीवपूर्वक पाण्यापासून वंचित ठेवले जाते यामुळे आक्रमक झालेल्या शिंगवेतुकाई ग्रामस्थांनी संजय बिरादार नेवासा तहसीलदारयांना आपल्या मागण्याचे निवेदनदिले असून लवकरात लवकरपाणी सोडावे पाणी न सोडल्याससोम दि 10 मार्च 2025 पासून शिंगवेतुकाई येथील तुकाई मातामंदिरात आमरण उपोषणास बसण्याचा इशारा शिंगवेतुकाईचे पांडुरंग होंडे,दत्तात्रय पवार,विठ्ठल पवार,भाऊसाहेब पवार, गणेश पवार,पांडुरंग पवार,कचरू पवार,कारभारी पवार,प्रवीण पवार,संकेत पवार,अमोल पवारयांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
नगर,राहुरी, पाथर्डी या तालुक्यातील गावांना वांबोरी चारीचे पाणी सुरू असताना नेवासा तालुक्यातील शिंगवेतुकाई ला पाण्याची तीव्र टंचाई असतांना पाणी सोडले जात नाही यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. इतर तालुक्याना वेगळा न्याय व नेवासा तालुक्याला वेगळा न्याय असा सवाल शिंगवेतुकाई ग्रामस्थ करत आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.