सोनई | संदिप दरंदले – कुटुंबामध्ये संस्कार घडवणे ही महत्त्वाची जबाबदारी असून सुरक्षितेच्या दृष्टीने जसा महिलांच्या डोक्यावर पदर असतो तसा अन्यायविरुद्ध व सुरक्षेतेच्या दृष्टीने कमरेला सुद्धा पदर खोचण्याची हिंमत ठेवावी, असे मत अहिल्यानगर महानगरपालिकेचे नगरसेविका दिपालीताई भारस्कर यांनी व्यक्त केले. त्या सोनई येथील कृषी महाविद्यालयात शारदाताई फाउंडेशन व कृषी महाविद्यालयाच्या वतीने महिला जागतिक दिन साजरा करण्यात आला, त्यावेळी अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या.सुनीताताई गडाख या नुसत्या महिला चळवळीच्या नेत्या नसून त्या कौटुंबिक ज्ञानाबरोबर संस्कार घडवण्याचे नेतृत्व व नेत्या आहेत. नेवासात बचत गट चळवळीत त्यांचे काम आदर्श आहे.

सध्या मुलींनी आई-वडील थोरांचा आदर ठेवून सोशल मीडियाच्या प्रवाहात वाहता कामा नये, समाजात सर्वांनी परस्री ही मातेसमान आहे, असे वागून महिलांच्या कर्तुत्वाची कौतुकाची थाप ही एक ऊर्जा असून त्या माध्यमातून आरोग्य जपण्याचा सल्ला यावेळी दिला.आपण जेव्हा बाहेर पडतो तेव्हा पुरुषांचा एक आत्मविश्वास आपल्याला मिळतो म्हणून आपण विविध क्षेत्रांमध्ये गुणसंपन्न होतो ,त्यामुळे पुरुषांचा देखील या ठिकाणी आदर ठेवला पाहिजे, असे मत नगरसेविका दिपाली बारस्कर त्यांनी व्यक्त केले. माजी सभापती सुनीता गडाख म्हणाल्या की, पुस्तके ज्ञानापेक्षा समाजात आलेल्या अनुभवाची शिदोरी खरी महत्त्वाचे असून, महिला एक शक्ती असून, आईचे प्रेमाला निस्वार्थी झालर असते, समाजात महिलांच्या कर्तुत्व व कामाला योग्य अशी संधी दिली जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

प्रत्येकाचे स्थान उंचावर असून त्यांची खरी ऊर्जा संयम ,चिकाटी, चरित्र व प्रेमळपणा हा गुण असून यापुढे महिलांनी एकजूट राहून समाज हित साधण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमास जयश्रीताई गडाख , उषाताई गडाख,ह.भ.प. तुलसी देवी,आशाताई दरंदले, डॉ. अनिता खोसे, डॉ. सायली लीपाने, डॉ. रजनी शिरसाठ, शेख भाभी,पेरणे,कोकाटे ताई,लताताई आठरे,जयताई घाडगे,सीताबाई माडगूळ,सुरेखा दरंदले, शंकुतला सागळें,द्वारका कुमावत,मीनाताई दरदले आदी महिला उपस्थित होत्या.सूत्रसंचालन प्रा.ज्योती वाघ यांनी तर आभार जाधव मॅडम यांनी मानले.महाविद्यालयाचे प्राचार्य मोरे व उपप्राचार्य बोरुडे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.