ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
बंधारा

बंधाऱ्यात पाणी सोडवून शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचे काम जलसंपदा विभागाने करावे-अशोक कारखान्याचे मा संचालक भागवतराव पवार

पाचेगाव – नेवासा तालुक्यातील पाचेगाव,निंभारी, इमामपूर,गोणेगाव व राहुरी भागातील तिळापूर या गावांना वरदान असणारा पाचेगाव बंधाऱ्यात वरील निळवंडे धरणातून पाणी सोडल्याणे जेणेकरून या पाच गावातील शेती व पशुसंवर्धन पाण्याचा पुढील दोन महिण्याकरिता प्रश्न मार्गी लागेल अशी मागणी शेतकऱ्यांना सह अशोक कारखान्याचे मा संचालक भागवत पवार यांनी केली आहे.

या भागात यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने भूगर्भातील पाणी पातळीत वाढ झालेली नाही.तसेच पाणी पातळी खोलवर गेली.शेतकऱ्यांचे असणारे पाण्याचे स्त्रोत काही ठिकाणी कमी झाले तर काही ठिकाणी थांबले. आता पाणी प्रश्न बिकट झाला आहे व भविष्यात या भागात आजून पाणी प्रश्न बिकट होणार असल्याने वरील निळवंडे धरणातून पाणी सोडून पाचेगाव,पुंनतगाव व मध्यमेश्वर हे तीन ही बंधाऱ्यात पूर्ण क्षमतेने भरून देण्यात यावे अशी मागणी पवार सह शेतकरी वर्ग करीत आहे.

बंधारा

सध्या पाचेगाव बंधारा पूर्णपणे कोरडाठाक पडला आह.हा बंधारा पूर्ण क्षमतेने भरल्याने एन उन्हाळ्यात शेती व पशुसंवर्धनाचा पाणी प्रश्न मार्गी लागेल,तसेच या बंधाऱ्यावर अवलंबून असणाऱ्या पाण्यावर शेतीचा प्रश्न मिटून पावसाळ्यापर्यन्त तरी पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी मोठी मदत होईल अशी अपेक्षा परिसरातील शेतकरी करीत आहे.

पाचेगाव व पुणतगाव बंधाऱ्यातुन पाणी गळती आजून थांबवण्यात जलसंपदा विभागाला यश आलेले नाही. सध्या एन उन्हाळ्यात जरी बंधाऱ्यात पाणी नाही,पणबंधाऱ्यात पाणी सोडले की या दोन्ही बंधाऱ्यात पाणी गळती मुळे जास्त काळ पाणी ठिकत नाही. तरी या दोन्ही बंधाऱ्यातुन पाणी गळती मोठ्या प्रमाणात होत असते. ही गळती थांबविण्याकरिता पाटबंधारे विभागाने काही तरी उपाययोजना करण्यात येवे अशी मागणी दोन्ही गावातील शेतकरी वर्ग करीत आहे.पाणी गळती जर थांबविली तरच दोन्ही बंधाऱ्यात भविष्यात पाणी टिकून राहील अन्यथा पाणी गळती होऊन बंधाऱ्या लवकरच मोकळे होतील.

बंधारा
बंधारा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

बंधारा
बंधारा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

बंधारा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!