नेवासा – जिल्ह्यात ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनी ड्राय डे असतानाही नवीन टिळक रस्त्यावरील हॉटेल निमंत्रण येथे मद्यविक्री सुरू असल्याने, तसेच मद्यविक्रीच्या नोंदवह्या अपूर्ण असल्याने निमंत्रण हॉटेलचा परमिट रूमचा परवाना रद्द करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी हे आदेश काढले आहेत.

राज्य उत्पादन शुल्क विभागाला ६ डिसेंबर रोजी ड्राय डे असतानाही निमंत्रण हॉटेल येथे मद्यविक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर विभागाचे दुय्यम निरीक्षक व कोतवाली पोलिसांच्या पथकाने हॉटेलवर छापा टाकला. त्यावेळी काही व्यक्ती मद्यप्राशन करत असल्याचे व हॉटेलमधील स्टाफ त्यांना मद्य पुरवत असल्याचे समोर आले. पथकाने घटनास्थळी पंचनामा करून तेथील नोंदवहीची तपासणी केली. त्यातही नोंदी अपूर्ण होत्या. पथकाने त्यांना जागेवरच आरोपपत्र असलेली नोटीस बजावून खुलासा मागवला. हॉटेलमध्ये जेवण करणारे व्यक्ती त्यांनी लपवून आणलेले मद्य घेत होते. हॉटेलमधील मद्यविक्री त्यादिवशी बंद होती, असा खुलासा हॉटेलचे मालक नंदकिशोर राऊत यांनी केलं.

त्यावर जिल्हाधिकारी सालीमठ यांनी हा खुलासा अमान्य’ करत ‘ड्राय डे’ च्या दिवशी मद्यविक्री सुरू होती, हे ‘गंभीर असल्याचे स्पष्ट करत मुंबई विदेशी मद्य नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी `निमंत्रण हॉटेलचा परमिट रूमचा परवाना रद्द केला आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.