नेवासा – नागपूर येथे झालेल्या खेलो इंडिया ऊमेन्स लीग राष्ट्रीय आष्टे डू मर्दानी आखाडा क्रीडा स्पर्धा 2024 – 25 या स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करीत नेवासा येथील महिला खेळाडू नी 4 सुवर्ण , 1 रजत , व 2 कांस्य पदक मिळविले दि 3 फेब्रुवारी 2025 रोजी वसंतराव नाईक गव्हर्नमेंट कॉलेज , नागपूर येथे या स्पर्धा पार पडल्या . या स्पर्धेत महाराष्ट्र , दिल्ली , राजस्थान , ऑडीसा , आसाम , केरळ , कर्नाटक , तामिळनाडू या राज्यातून 225 महिला स्पर्धक सहभागी झाले होते या स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करीत नेवासा येथील आष्टे डू मर्दानी आखाड्याच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले.

शिवकला प्रकारात सृष्टी वाल्हेकर सुवर्ण पदक , निशा जाधव रजत पदक , तेजल सुरोशे ,श्रेया चव्हाण यांना कांस्य पदक , तर दांडपट्टा या प्रकारात प्रियांका राहिंज, आरुषी नरोडे उत्कर्षा आलवने ,सुवर्ण पदक मिळविले . या सर्व खेळाडूंना मास्टर सुरेश लव्हाटे यांचे मार्गदर्शन लाभले . यशस्वी खेळाडूंचे अहिल्यानागर आष्टे डू मर्दानी आखाडा असोसिएशन चे अध्यक्ष संजय सुखदान यांनी अभिनंदन केले नेवासा शहर व तालुक्यातुन या खेळाडूंचे अभिनंदन होत आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.