पाचेगाव – अशोक सहकारी साखर कारखान्याच्या कारेगाव विभाग शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनी लिमिटेडच्या संचालकपदी पुनतगाव ता नेवासा येथील प्रतीक मच्छिंद्र वाकचौरे यांची निवड अशोक कारखान्याचे चेअरमन, लोकनेते माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
यावेळी कारखान्याचे अध्यक्ष मा आ भानुदास मुरकुटे,व्हा चेअरमन हिम्मतराव धुमाळ, ज्येष्ठ संचालक कोंडीराम उंडे, युवक नेते सिद्धार्थ मुरकुटे, कार्यकारी संचालक संतोष देवकर,अशोक शिक्षण संस्थेच्या कार्यकारी अधिकारी सौ. मंजुश्रीताई मुरुकुटे, विद्यमान संचालक निरज मुरुकुटे,पाचेगाव येथील संचालक ज्ञानेश्वर शिंदे,मा संचालक भागवतराव पवार, हनुमंत वाकचौरे, फकिरा वरुडे,दिगंबर नांदे,भगवान काळे,आशपक देशमुख,पुनतगावचे सरपंच सुदर्शन वाकचौरे,नामदेव पवार,राजेंद्र शिंदे,ज्ञानेश्वर वाघमारे,ऍड सोमनाथ वाकचौरे,अशोक वाकचौरे,मच्छिंद्र वाकचौरे आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

पुनतगाव येथील तरुण पिढीतील युवकांना या माध्यमातून संधी देत असल्याने नूतन संचालक प्रतीक वाकचौरे यांनी आपली अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व संचालकांचे आभार व्यक्त केले. या नूतन संचालकपदी विराजमान झालेल्या प्रतीक वाकचौरे यांचे परिसरातून अभिनंदन करण्यात आले आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.