गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील महालक्ष्मी हिवरे येथे दुचाकीच्या धडकेत येथील तरुण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर असे दि. २६ जानेवारी रोजी सकाळी १०.४५ वाजेच्या दरम्यान चांदा ते महालक्ष्मी हिवरे रस्त्यावर केदार सानप वस्ती समोर सचिन संजय सानप (वय.१६) हा तरुण पायी घरी जात असताना त्याला पाठीमागून येणाऱ्या अज्ञात दुचाकिस्वाराने जोरदार धडक दिल्याने त्यात तो गंभीर जखमी झाला असल्याची फिर्याद त्याचे वडील संजय मारुती सानप (वय.४६) यांनी सोनई पोलीस ठाण्यात दि. १० रोजी दाखल केलेल्या फिर्यादी मध्ये म्हटले आहे. अज्ञात दुचाकी स्वाराविरुध्द गुन्हा र. नं. ३६/२०२५ बिएनएस चे कलम २८१,१२५(अ), १२५(ब), मोटार वाहन कायदा कलम १८४/१७७(अ), (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल तुपे करत आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.