नेवासा – गेल्या आठवड्यापासून शेअर बाजारात गुंतवणूकदारांमध्ये निरुत्साह दिसत असून त्याचा परिणाम सेन्सेक्स आणि निफ्टीच्या घसरणीमध्ये दिसत आहे. सोमवारी सेन्सेक्स आणि निफ्टीने गटांगळी खाल्लानंतर मंगळवारीही बाजाराची सुरुवात निराशाजनक झालेली दिसली. बीएसई सेन्सेक्स आज १,१०६ अंशांनी कोसळला. १.४३ टक्क्यांच्या घसरणीसह सेन्सेक्सने .७६, २०५.५२ चा तळ गाठला. तर निफ्टी५० मध्ये ३४९ अंशानी घसरण पाहायला मिळाली. दुपारी १.३० च्या आसपास निफ्टी५० निर्देशांक २३,०३२ वर घसरला.

व्यापक बाजारात मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांकात अनुक्रमे ३.५ टक्के आणि ३.९ टक्के इतकी घसरण झाली. बीएसईवर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे – बाजारमूल्य आज ९.८७ लाख कोटींनी घटून ते ४०७.८५ लाख कोटींवर पोहोचले. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि कोटक महिंद्रा बँकेच्या. शेअर्समध्ये. सर्वाधिक घसरण पाहायला मिळाली. हे शेअर्स ३ टक्क्यांनी घसरले.
शेअर बाजार का घसरला ?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी स्टिल आणि अल्युमिनियम धातूवरील आयात शुल्क कोणताही अपवाद किंवा सूट न देता २५ टक्क्यांनी वाढवले. नवे आयात शुल्क दर ४ मार्च पासून लागू केले जातील, असे व्हाइट हाऊसमधील अधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.