नेवासाः येथील दुर्गादेवी मंदिराजवळील रहिवासी गं. भा. श्रीमती लिलाबाई दशरथराव पठाडे (वय९५) वर्षे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सूना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. जेष्ठ पत्रकार रामभाऊ पठाडे, शामराव पठाडे, आप्पासाहेब पठाडे यांच्या त्या मातोश्री होत्या तर पत्रकार सुहास पठाडे, दत्तात्रय पठाडे, किशोर पठाडे, तेजस पठाडे सार्थक पठाडे यांच्या त्या आजी होत्या.

नेवासा येथील अमरधाममध्ये शोकाकुल वातावरणात कै. लिलाबाई पठाडे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नेवासा बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील, शिवसहकार सेनेचे राज्य उपप्रमुख बालेंद्र पोतदार, भाजपच्या वतीने अँड. संजीव शिंदे, अशोक ताके, मनोजअण्णा पारखे, जैन श्रावक संघटनेचे अमृत फिरोदिया, राष्ट्रवादीचे नेते गफूरभाई बागवान यांनी श्रद्धांजली वाहिली.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.