लोहोगाव ग्रामपंचायतमधील भ्रष्टाचाराविरोधात ग्रामसभेत ग्रामस्थ आक्रमक; प्रत्यक्षात पुल न बांधताच लाटले लाखो रुपयांचे बिल, विद्यूत मोटारींची कागदोपत्री दाखवली खरेदी.लाखोंचा भ्रष्टाचार उघड
नेवासा – लोहोगाव ता नेवासा येथील ग्रामसभा गेल्या काही वर्षांपासून घेतली जात नव्हती व ग्रामपंचायत सदस्य यांचीही मासिक मीटिंगघेतली जात नव्हती ही बाब लोहोगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश कल्हापुरे व इतर सुज्ञ नागरिकांनी निदर्शनास आणून दिल्याने पाठपुरावा केल्याने 26 जानेवरीची ग्रामसभासोम दि 17 फेब्रु रोजी लोहोगाव ग्रामसभा शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाली.

या सभेत सन 2022 ते 2023 व सन 2023 ते 24 या कालावधीत तत्कालीन सरपंच व विद्यमान सरपंचयांनी लोहोगाव ता नेवासा येथेपाटोळे वस्ती लगत एक पूल बांधकाम केल्याचे दाखवले व प्रत्यक्षात काम न करता 1 लाख 44 हजार रुपयांचे बिल काढले तसेचदोस्ती इलेक्ट्रॉनिक च्या नावाने मोटार दुरुस्ती मटेरियल तसेच मोटारखरेदी कामी व इले मोटार दुरुस्तीसाठीलाखो रुपयांचे बिल काढलेतसेच जाणीवपूर्वक काही व्यक्तीच्या नावे सदर व्यक्तींचा त्या बिलाशी काहीही संबंध नसतांना विविध मार्गाने पॅसें काढले आहेत ते प्रत्यक्षात कुठल्या कामासाठी वापरले याचा कुठलाही हिशेब दिसत नाहीवज्या दुकानाच्या नावे मोटार खरेदीचे बिल काढले त्या दुकानात इले मोटारच मिळत नाही तसेच 15 वित्त आयोगाचे कामे नियमबाह्य पध्दतीने देऊन कमी रकमेच्या निविदा नाकारून व जाणीवपूर्वक वाढीवदराने देण्यात आलेली कामे यासह विविध प्रश्नांवर लोहोगावच्या ग्रामसभेत वादळी चर्चा झाली.

सुरेश कल्हापुरे व ग्रामस्थ यांनी विविध प्रश्न विचारताच ग्रामपंचायत कारभारात इतर सदस्य यांना विश्वासात न घेता काम करणारेसरपंचपदी यांची उत्तरे देतांना धांदल उडाली. लवकरातलवकर झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई करावी अशी मागणी लोहोगाव ग्रामस्थांनी एकमुखाने केली. याप्रसंगी चर्चेत सुरेश कल्हापुरे,दत्तात्रयसौ शारदाबाई शिरसाठ,सनी शिरसाठ,प्रमोद घुले, यांनी चर्चेत सहभाग घेतला. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी म्हतारदेव ढेरे हे होतेचौकट…प्रत्यक्षात कामे न करतालाखो रुपयांची बिले काढण्यात आलेली असून याची सखोल चौकशी करण्यात यावी व दोषींवर कारवाई करण्यात यावी.
पुलच गेला चोरीला.प्रत्यक्षात पुलाचे काम दलित वस्तीत न करतापुलाचे काढलेले पॅसें व एका बनावट दुकानातून मोटार खरेदी केल्याचे दाखवुन केला गेलेला भ्रष्टाचार ऑनलाइन प्रणाली असतांना कुठल्याही अधिकाऱ्यांच्या लक्षात कसा आला नाही याबद्दल ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.
-सुरेश कल्हापुरेग्रामस्थ लोहोगाव.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.