नेवासा – राज्यातील लाडक्या बहिणींसाठी फेब्रुवारीचा हप्ता वेळेच्या आधीच मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारीचा हप्ता आजपासून द्यायला सुरुवात होणार आहे. यासाठी वित्त विभागाकडून ३४९० कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत. दरम्यान, यावेळी जानेवारीच्या तुलनेमध्ये फेब्रुवारीत लाभार्थीची संख्या घटण्याची शक्यता आहे.
लाडक्या बहिणींचा फेब्रुवारीचा हप्ता कधी जमा होणार? असा सवाल उपस्थित केला जात होता. पण आता आजपासूनच लाडकी बहिण योजनेचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे. डिसेंबर अखेर २ कोटी ४६ लाख महिला लाभार्थी होत्या. त्यातील ५ लाख महिला अपात्र झाल्यानंतर जानेवारीअखेर २ कोटी ४१ लाख लाभार्थी महिला होत्या.

मात्र, अद्याप फेब्रुवारी अखेरची आकडेवारी आलेली नाही. मात्र, त्यमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून कमी केलेल्या महिलांची संख्या ९ लाख होणार आहे. यापूर्वी ५ लाख महिलांची नावं कमी करण्यात आली होती. आता नव्याने ४ लाख महिलांची संख्या कमी होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या ९४५ कोटी रुपयांची बचत होणार असल्याची माहिती आहे. नमो. शेतकरी योजनेचा लाभ आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या ५ लाख महिला आहेत. या महिलांना लाडकी बहिण योजनेतील फक्त ५०० रुपये मिळणार तर नमो शेतकरी योजनेतून १००० रुपये मिळणार आहेत. दिव्यांग विभागातून लाभ मिळणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून त्यांना वगळलं जाणार आहे. वाहनं असलेल्या अडीच लाख महिला आहेत त्यांना ही यातून वगळण्यात आलं आहे. सोबतच निकषात न बसणाऱ्या अनेक महिला आहेत त्यांनी ही पैसे परत करायला सुरुवात केली आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.