सोनई – ता नेवासा येथील बस स्टॅण्ड परिसरात माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या पुढाकाराने साकारलेल्या अश्वारूढ पुतळ्यास शिवजयंती निमित्त दुग्धाभिषेक व महाआरती जिल्हा परिषदेचे अर्थ व पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनीलराव गडाख व सोनई व परिसरातील 7 दाम्पत्यांच्या उपस्थितीत करण्यात आली. याप्रसंगी बोलताना सुनीलराव गडाख म्हणाले समाजात एकोपा कायम टिकून ठेवायचा असेल तर सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन कार्य करावे.शिवरायांचे विचार
आत्मसात केल्यास जीवनातील प्रत्येक संकट हसत हसत परतावून लावता येते. लहान मुलांना शिवरायांचे विचार समजावून सांगितल्यास लहान मुले उद्याचे आदर्श नागरिक बनणार असून त्यांच्या हातून समाज बांधणीचे काम होणार आहे असे म्हणाले
व उपस्थितांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी आप्पा महाराज निमसे,आदिनाथ महाराज रौदळ,संदीप लोंढे अमित काळे, गणेश गडाख, डॉ संकेत दरंदले ,कृष्णा दरंदले आदीसह सोनई व परिसरातील शिवप्रेमी ग्रामस्थ तरुण मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायंकाळी उदयन गडाख यांच्या हस्ते आरती करून शिवजयंती उत्सवाची सांगता करण्यात आली. यावेळी जय भवानी,जय शिवाजी च्या घोषणांनी
तरुणांनी परिसर दणाणून सोडला होता.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.