नेवासा – नेवासा प्रेस क्लबचे संस्थापक पत्रकार गुरुप्रसाद देशपांडे यांच्या सुविद्य पत्नी व ज्ञानांकुर बालवाडीचे संस्थापिका कवयित्री सौ.स्मिताताई देशपांडे यांचे अकस्मात निधन झाले.मृत्यूसमयी त्यांचे वय ५५ वर्षे होते.
कै.स्मिताताई देशपांडे यांच्या पच्यात पती,दोन मुली,एक मुलगा,सासू, सासरे असा परिवार आहे.अत्यंत मनमिळाऊ स्वभावाच्या व धार्मिक वृत्तीच्या असलेल्या सौ.स्मिताताई देशपांडे यांच्या अकस्मात निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

जेष्ठ पत्रकार मधुकरराव देशपांडे व आदर्श शिक्षिका सौ.शरदिनी देशपांडे यांच्या त्या सूनबाई होत्या. नाशिक येथील अमरधाममध्ये शोकाकुल वातावरणात सौ.स्मिताताई देशपांडे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.नेवासा प्रेस क्लब तसेच नाशिक येथील विविध संस्थेच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.