ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
नेवासा प्रेस क्लब

नेवासा – नेवासा प्रेस क्लबच्या वतीने देण्यात येणारे पुरस्कार जाहिर करण्यात आले असून नेवासा येथे सोमवारी (दि.६) पत्रकार दिनाच्या दिवशी या पुरस्काराचे वितरण होणार आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून पत्रकारिता क्षेत्रात काम करणारे शहरातील पत्रकार शंकर नाबदे, राजकिय पटलाच्या माध्यमातून सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे सचिन देसरडा व विधी तज्ञ, समाज भूषण स्व. ऍड. के. एच. वाखुरे (मरणोत्तर) असे पुरस्कार जाहीर करण्यात आले असल्याची माहिती प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन गायकवाड यांनी दिली आहे.

नेवासा प्रेस क्लब

नेवासा येथील औदुंबर चौकात सोमवार दि ६ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता हा पुरस्कार वितरण कार्यक्रम ह.भ.प उद्धव महाराज मंडलिक नेवासकर यांच्या शुभहस्ते तर संस्थापक अध्यक्ष गुरुप्रसाद देशपांडे मार्गदर्शनाखाली होणार आहे.

नेवासा प्रेस क्लब

वेगवेगळ्या क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांच्या आयुष्याचा प्रवास हा जिद्दीचा व सातत्याचा असतो म्हणूनच तालुक्यातील पत्रकार बांधव व नागरिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन प्रेस क्लबचे सदस्य अशोक डहाळे, सुधीर चव्हाण, कैलास शिंदे, सुहास पठाडे, मकरंद देशपांडे, शाम मापारी, रमेश शिंदे, नानासाहेब पवार, पवन गरुड, अभिषेक गाडेकर यांनी केले.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

नेवासा प्रेस क्लब
नेवासा प्रेस क्लब
नेवासा प्रेस क्लब

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

नेवासा प्रेस क्लब

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!