नेवासा – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळ आणि महाविद्यालयाचे डॉ. अण्णासाहेब शिंदे ग्रंथालय, यांच्या विद्यमाने महाविद्यालयात इ-कंटेंट निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेमध्ये एसएसजीएम महाविद्यालय, कोपरगाव येथील ग्रंथपाल प्रा. खैरनार सी.व्ही. आणि डॉ. आदलिंग आर.बी. यांनी मार्गदर्शन केले.
प्रा. खैरनार यांनी इ-कंटेंट म्हणजे काय याबाबत माहिती दिली. डॉ. आदलिंग यांनी इ-कंटेंट कसे तयार करावेत ? लिखित स्वरूपातील तसेच दृक्श्राव्य पद्धतीचे इ-कंटेंट तयार करून ते विविध सोशल माध्यमावर कसे प्रकाशित करावेत, इ-कंटेंट कसे तयार करावेत व ते ग्रंथालयांनी त्यांच्या वाचकांना विविध लिंक्सच्या सहाय्याने कसे उपलब्ध करून द्यावेत ? याबाबत प्रात्यक्षिक दाखविले.

प्राचार्य डॉ. कल्हापुरे यांनी इ-कंटेंटचे महत्व, त्यांची उपयुक्तता याबाबत माहिती दिली. पाहुण्यांचा परिचय ग्रंथपाल प्रा. प्रकाश कोकणे यांनी दिला. डॉ.वर्षे एम.जी. यांनी आभार मानले. तर डॉ. कार्तिकी नांगरे यांनी सूत्रसंचलन केले. कार्यशाळेसाठी उपप्राचार्य डॉ. घनवट ए.जे., डॉ. सोनवणे बी. एन., डॉ. कर्डिले एच. जे., डॉ. जगताप बी.एस., डॉ. मिसाळ एन. व्ही., प्रा.घोरपडे पी.के., डॉ. कांगुणे एल. आर., डॉ. खंदारे आर.बी., डॉ.चव्हाण आर.एम., डॉ. बर्डे बी. आर., प्रा. सरगैय्ये आर. डी. यासह विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते. ग्रंथालय सेवक पठाडे जी.एस., पटारे संदीप व संदीप भुजबळ इतर शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. यावेळी शिक्षक आदींसह मान्यवर उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.