ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
महाकुंभ

नेवासा – प्रयागराज येथील महाकुंभमेळा २०२५ मध्ये शुक्रवार सकाळपर्यंत ४२ कोर्टीपेक्षा अधिक भाविकांनी पवित्र स्नान केले. महाकुंभमेळ्याला आणखी १९ दिवस शिल्लक असून स्नान करणाऱ्यांची संख्या ५० कोटींपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे.

महाकुंभमेळ्यादरम्यान मकर संक्रांत, मौनी अमावस्या आणि वसंत पंचमी अशी तीन अमृत स्नान पर्व झाली असली, तरी भाविकांचा उत्साह कायम आहे. जगभरासह भारताच्या कानाकोपऱ्यातून लोक पवित्र त्रिवेणी संगमावर स्नान करण्यासाठी येत आहेत. यामध्ये १ कोटी कल्पवासी तसेच जगभरातील भक्त आणि साधू यांचा समावेश आहे. सर्वाधिक आठ कोटी भाविकांनी मौनी अमावास्येच्या दिवशी पवित्र स्नान केले, तर मकर
संक्रांतीच्या दिवशी साडेतीन कोटी भाविकांनी स्नान केले. ३० जानेवारी आणि १ फेब्रुवारी या दोन्ही दिवशी
२ कोटींहून अधिक जणांनी स्नान केले, तर पौष पौर्णिमेला १.७कोटीहून अधिक भाविकांनी पवित्र स्नान केले. शिवाय, वसंत पंचमीला अडीच कोटी भाविकांनी त्रिवेणी संगमावर स्नान केले.

महाकुंभ

श्रीपाद नाईक या केंद्रीय मंत्र्यांनी आणि खासदार डॉ. सुधांशू त्रिवेदी, सुधा मूर्ती, रवि किशन यांनीही स्नान केले आहे. इतर प्रमुख व्यक्तींमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद, समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव, ऑलिम्पिक पदक विजेती सायना नेहवाल, प्रसिद्ध कवी कुमार विश्वास, क्रिकेटपटू सुरेश रैना, आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू खली, नृत्यदिग्दर्शक रेमो डिसोझा आदीचा समावेश आहे.

संगमावर पवित्र स्नान केलेले मान्यवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर प्रमुख नेत्यांनी आधीच संगमावर स्नान केले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूही १० फेब्रुवारीला संगमावर पवित्र स्नान करणार आहेत. याशिवाय, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, राजस्थान, हरयाणा, मणिपूर आणि गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी पवित्र स्नान केले आहे. गजेंद्र सिंह शेखावत, अर्जुन राम मेघवाल

महाकुंभ

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

महाकुंभ
महाकुंभ

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

महाकुंभ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!