नेवासा – दहावी आणि बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार (कॉपी) करताना सापडल्यास त्यावर थेट दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार आहे. यामध्ये अशा गैरप्रकाराना उद्युक्त करणारे, मदत करणाऱ्यावरही थेट कारवाई केली जाईल, असा इशारा शुक्रवारी (७फेब्रुवारी) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांना सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला आहे.
बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून सुरू होत असल्यामुळे कॉपी व अन्य गैरप्रकार करताना पकडल्या गेलेल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर हा निर्णय गंभीर परिणाम करणारा ठरू शकतो. यामुळे राज्य मंडळाने कॉपीमुक्त अभियानाच्या कडक अंमलबजावणीबाबत सावधानतेचा इशारा दिला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेत यंदा १४ लाख ९४ हजार बारावीचे विद्यार्थी, तर १६ लाख ७ हजार दहावीचे, असे एकूण ३१ लाखांवर विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षेसाठी तब्बल एक लाख ८० हजारांहून अधिक मनुष्यबळ कार्यरत करण्यात येणार आहे.
कॉपी न करण्याचे आवाहन
विद्यार्थ्यांवर असणार कडक निर्बंध
परीक्षा केंद्रांवर गैरप्रकारांना कोणत्याही प्रकारे मदत करणाऱ्यांवर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येणार.
संवेदनशील परीक्षा केंद्रांवर ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे नजर
परीक्षा केंद्राबाहेर जिल्हा प्रशासनामार्फत व्हिडीओ चित्रीकरण करणार.
कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर भरारी पथके व बैठी पथके राहणार. परीक्षा केंद्रांवर नियुक्त केलेल्या केंद्रसंचालक,पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित घटकांची फेशिअल सिस्टीमद्वारे तपासणी होणार. परीक्षा केंद्रांपासून ५०० मीटर परिसरात झेरॉक्स सेंटर परीक्षा
कालावधीत बंद ठेवण्यात येणार. परीक्षा केंद्रांच्या परिसरात १४४ कलम लागू करणार.

विद्यार्थी आणि त्यांना कॉपी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्यांवरही थेट गुन्हा दाखल केला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये, शांतपणे पेपर लिहावेत. कॉपी करू नये, असे आवाहन मंडळाने केले आहे.
हॉल तिकीट विसरले तरी परीक्षेची मुभा
हॉल तिकीट विसरलेल्या विद्यार्थ्याला परिक्षेला त्या दिवशी बसू दिले जाईल. मात्र त्याच्याकडून हमी पत्र लिहून घेतले जाईल आणि दुसऱ्या दिवशी मात्र त्याला हॉल तिकीट आणावे लागेल. परीक्षेला कोणत्याही वेशभूषेत येता येईल, असेही परीक्षा मंडळाने स्पष्ट केले आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.