नेवासा – तालुक्यातील ज्ञान प्रीमियर लीग पर्व दुसरेच्या भव्य डे – नाईट क्रिकेटच्या महासंग्रामाच्या लिलाव पध्दतीचा सोहळा व टी – शर्ट किट चे अनावरण लक्ष्मी मंगल कार्यालय येथे संपन्न झाला यामध्ये बारा संघाने सहभाग घेतलेला आहे या लिलावात सहभाग घेण्यासाठी खेळाडूंनी ऑनलाईन पध्दतीने फॉर्म भरले होते व त्या खेळाडूंना आपल्या संघामध्ये घेण्यासाठी सर्व संघमालकांनी बोली लावून त्यांना आप-आपल्या संघात सामाविष्ट केले त्यामुळे तालुक्यातील सर्व खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण पाहावयास मिळाले.
या कार्यक्रमाची सुरुवात संत ज्ञानेश्वर माऊलीला पुष्पाहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली या वेळेस कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपनगराध्यक्ष नंदकुमारजी पाटील हे होते.

या कार्यक्रमास पत्रकार मकरंद देशपांडे, राजूभाऊ वाघमारे,शंकरजी नाबदे तसेच राजुभाऊ उंदरे, गणेश निमसे, जावेदभाई इनामदार, संजय मारकळी, दीपकशेठ अकोलकर आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमासाठी नेवासा प्रेस क्लब व सर्व तालुक्यातील पत्रकार बांधवांचे, शिव नेटवर्कचे सौरभ मुनोत, रिफ्लेक्शन् मिडीयाचे रवीभाऊ शेरकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी मान्यवरांनी त्यांच्या भाषणामध्ये या स्पर्धेमुळे तालुक्यातील खेळाडूंना या संधीचा फायदा कसा घेता येईल या बद्दलची माहीती दिली. या स्पर्धेत (शिवम फायटर -नेवासा बु,संघमालक- अक्षय जायगुडे), (जनता गॅरेज-नेवासा,संघमालक-धनुभाऊ काशीद), (दहिवळकर सराफ-नेवासा फाटा,संघमालक- विजयशेठ दहिवाळकर , रितेश भाऊ कराळे), (मक्तापूर ब्लास्टर -मक्तापूर,संघमालक- संचालक भरत भाऊ काळे), (चॅम्पियन्स सुपर किंगज -CSK -नेवासा फाटा,
संघमालक-डॉ. शिवाजी गोरे),(श्री आर्यन्स -नेवासा फाटा, संघमालक – प्रतापराजे हांडे),

(विघ्नहर्ता ब्लास्टर -बेलपांढरी,संघमालक- किशोरभाऊ धोत्रे), (फ्रेंड्स क्रिकेट क्लब-मक्तापुर,संघमालक-मनोज भाऊ झगरे, अजय भाऊ कोळेकर),(हॉटेल दत्त प्रसाद-11- नेवासा, संघमालक- अमोल सुरोशे, गॅटसाहेब काळोखे, (जगदंब-11-कुकाणा,संघमालक- श्री अब्दुल भैय्या शेख, श्री.अशोक मोरे), (छत्रपती शिवाजी किंगज ब्लास्टर्स-CSK -मुकिंदपुर, संघमालक- डॉ. शंकर वंजारी,भाऊसाहेब भूमकर),(पसायदान स्पोर्टस् क्लब-नेवासा,संघमालक- निलेश खंडाळे,संदीप वीर)या बारा संघानी सहभाग घेतलेला आहेत. या लिलाव पद्धतीमध्ये सर्व संघाना एक लाख पॉईंट देण्यात आले होते त्यामध्ये सर्वात जास्त अक्षय जऱ्हाड या खेळाडूला ७९००० हजार पॉईंटला CSK या संघाने बोली लावली त्याखालोखाल क्षितिज सोनवणे,समीर शहा,आदी पुंड व भारत दारकुंडे या खेळाडूंना बोली लावण्यात आली.
तालुक्यामध्ये डी.पी.एल. या स्पर्धेने धुमाकूळ घातला असून त्यांची सुरुवात होण्याची सर्वांना उच्छुकता लागली आहे.
यावेळी ज्ञान फाउंडेशन, पसायदान स्पोर्ट्स क्लब व गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब चे सर्व सदस्य उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक देवीदास साळुंके सर व शेरखान भाई यांनी केले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.