फ्लेक्स बोर्ड काढून घेण्यासाठी सरपंचांना दिले निवेदन.
नेवासा – अहिल्यानगर ते छत्रपती संभाजी नगर रोडवर नेवासा फाटा येथे अनधिकृत पणे अनेक ठिकाणी मोठमोठे फ्लेक्स बोर्ड (होर्डिंग्ज) लावले आहेत. सदर बोर्ड लावताना ग्रामपंचायतीकडे कुठल्याही प्रकारचा कर भरला गेला नसून गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या तरुणांचे फोटो यावर लावले जातात. त्यामुळे गुंडगिरीला वाव मिळतो , जातीय तेढ निर्माण होते आणि अपघाताला ही निमंत्रण मिळते म्हणून अशा प्रकारचे बोर्ड यापुढे नेवासा फाटा येथे कुठेही लावले जाऊ नयेत..

यासाठी नेवासा फाटा येथे आरपीआय आठवले गटाचे तालुकाध्यक्ष सुशील धायजे आणि शहराध्यक्ष पप्पूभाऊ इंगळे यांनी सरपंच दादा निपुंगे यांना निवेदन दिले. सदर फ्लेक्स बोर्ड लावणाऱ्यांवर लवकरात लवकर कारवाई करून हे बोर्ड काढून टाकण्यात यावेत, अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने ते काढून टाकू असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी संजय बनसोडे, सुरेश गायकवाड, राजू इंगळे, संतोष मोरे, अजय बर्डे, बाळासाहेब ठोंबरे, सोमनाथ साठे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.