नेवासा – दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या दणदणीत विजयाबद्दल नेवासा शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांसह नगरपंचायत चौक येथे फटाके फोडुन व पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला.
यावेळी भाजपाचे जेष्ठ नेते भास्करराव कणगरे, युवा नेते मनोज पारखे, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे, अजितसिंह नरुला व प्रदेश सचिव निरंजन डहाळे यांनी आपले मनोगत व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा व गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वावर दिल्लीकरांनी विश्वास दाखवत डबल इंजिनच्या सरकारला निवडल्याचे सांगितले तसेच नेवासा तालुक्यातील आगामी निवडणुकांमध्येही दिल्लीच्या निकालाची पुनरावृत्ती नेवासकरांनी करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी जेष्ठ नेते अशोक ताके, भास्करराव कणगरे, मंगेश दारुंटे, किरण दारुंटे, अजित नरुला, राजेश कडू, शिवाजी लष्करे, करण पोटफोडे, श्रीराम लष्करे, निलेश शेंडे, राजूभाऊ खंडागळे, शशिकांत पारखे, निखिल जोशी, प्रदीप जाधव, विलास बोरुडे, निखिल जोशी, अभय मोहिते, कैलास लष्करे, सुधाकर शेंडे, सुशांत पारखे, सुनील हारदे अभिषेक शेजुळ, मनोज डहाळे, आप्पासाहेब गायकवाड, निरंजन डहाळे, मोहन शुक्रे, अनुज बोर्डे, रोहित लष्करे, आज्जु शेख, सचिन चांदणे, शशीकांत पारखे, महेश पारखे, बाळासाहेब दारुंटे, अनंता डहाळे आदी उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.