दर्शन घेऊन परतताना वंजारवाडीत घेतला उसाच्या रसाचा आस्वाद.
सोनई – जागतिक कीर्तीचे देवस्थान आसलेल्या श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथे शनी दि 8 फेब्रु 2025 रोजीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी यांनी शनिमूर्तीस तैल अर्पण करूनमहंत उदासी महाराजमठात अभिषेक पुजा केली.याप्रसंगी बोलतांनाजशोदाबेन मोदी म्हणाल्या शनिदर्शनाने मनाला आत्मिक समाधान लाभलेखूप दिवसांपासून दर्शनासाठी येण्याची इच्छा होती ती आज पूर्ण झाली असल्याचे त्या म्हणाल्यादेवस्थान परिसरात झालेल्या कामांचे त्यांनी तोंड भरून कौतुक केले.

देवस्थानच्या वतीने जनसंपर्क अधिकारी अनिल दरंदले,उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी त्यांचा सन्मान केलात्यांच्या सोबत भाऊ सोमाभाई हे होतेदर्शन घेऊन परतत असतांना वंजारवाडी येथीलकैलास आव्हाड यांच्या मामा रसवंतीगृहास त्यांनी भेट देऊन उसाच्या रसाचा आस्वाद घेतलारसवंतीगृहावर सेंद्रिय गुळ,शहाळे यांची 3000 हजार रुपयांची खरेदी केली व रसवंतीगृह चालकास आग्रहाने पैसे दिलेव वंजारवाडी परिसरातील समृद्ध शेती आवडली असल्याचे म्हणाल्याव शिक्षिका म्हणून त्यांनी काम केले असून सध्या सेवानिवृत्त असल्याचे सांगितले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.